मनसेतून बडतर्फ केल्यानंतर भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नुकतीच भाजपचे नेते आ. प्रवीण दरेकर आणि प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांचा रखडलेला भाजपा प्रवेश आता लवकरच मार्गी लागेल, असे बोलले जात आहे. वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश तब्बल दोनवेळा लांबणीवर पडला होता. लवकरच तो होईल, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वैभव खेडेकर यांनी आ. प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. अभिनंदनासह राजकीय चर्चा सूत्रांनी दिलेल्या वैभव माहितीनुसार, खेडेकर यांनी भाजप नेते आ. प्रवीण दरेकर नियुक्ती यांची ‘स्वयंपूर्ण विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी’ झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भेट घेतली. मात्र ही केवळ सदिच्छा भेट नव्हती. तर या भेटीत खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. खेडेकर यांचा प्रवेश लवकरच व्हावा यासाठी दरेकर यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे बोलले जाते.
यावेळी खेडेकर यांच्यासोबत वसंत पिंपळकर हे उपस्थित होते. संवाद प्रदेशाध्यक्षांशी आ. प्रवीण दरेकर यांच्या भेटीनंतर वैभव खेडेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही भेट घेतली. कोकणातील राजकारणावर आणि आगामी वाटचालीसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्षांशी झालेल्या भेटीमुळे आता प्रवेशाचा निश्चित मुर्त लवकरच ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवेशाला मिळणार ‘ग्रीन सिग्नल’ मनसेमधून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात होता. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तयारी देखील केली होती, मात्र प्रवेश लांबल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. आत दरेकर आणि चव्हाण या दोन्ही बड्या नेत्यांशी झालेल्या चर्चेमुळे या महिन्यातच त्यांचा पक्ष प्रवेश होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.