25.2 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunचिपळूणमध्ये जलकुंडानं साठवलं पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी

चिपळूणमध्ये जलकुंडानं साठवलं पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी

'कोकण जलकुंड' ही योजना कोकणवासीयांसाठी आशेचा नवा झरा ठरत आहे.

कोकणाला मुसळधार पावसाचे वरदान मिळालेले असूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून शासनाच्या कोकण जलकुंड योजनेतून चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथील शेतकरी राजेंद्र गावकर यांनी २५ गुंठ्यात शेततळे उभारले आहे. त्यात पाणी साठले असून, त्याचा उपयोग उन्हाळ्यात बागायतीला होणार आहे. या शेततळ्यामुळे कातळजमीन आणि अल्पक्षेत्रात दुबार शेती करणे शक्य होणार आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरीही, ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण कमी होते. कातळजमीन आणि छोट्या जमिनीच्या तुकड्यांमुळे शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याचा लाभमिळावा, या उद्देशाने कृषी विभागाने राबवलेली कोकण जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. ही योजना जिल्ह्यात राबवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात आला. कोकणात मोठ्या प्रमाणात आंबा-काजूच्या बागा आहेत. दरवर्षी जिल्ह्यात साडेतीन हजार मिलिमीटर सरासरी पाऊस पडूनही जानेवारीनंतर पाण्याची कमतरता भासते.

कातळजमिनीमुळे मोठी शेततळे बांधणे अशक्य होते. या परिस्थितीत ‘कोकण जलकुंड’ ही योजना कोकणवासीयांसाठी आशेचा नवा झरा ठरत आहे. गावकर यांनी या योजनेचा लाभ घेत २५ गुंठ्यात ५२ हजार लिटरचा साठा केला आहे. हे पाणी भविष्यात दुबार शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. हा अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरलेला आहे. या योजनेबद्दल गावकर म्हणाले, माझे वडील धाकटू गावकर यांच्या नावे असलेली शेती मी कसत आहे. २०२४- २५ यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून कोकण जलकुंड योजनेंतर्गत निधी मंजूर झाला. ते कुंड उभारल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. आता ते तुडुंब भरलेले आहे. पूर्वी दीड-दोन किलोमीटरवरून पाण्याचे पिंप मोटारसायकलीवरून वाहून आणावे लाग होते. आता शेतातच पाणी साठवले गेले आहे.

चिपळूण तालुक्यात ६० जलकुंड पूर्ण – जलकुंडाविषयी माहिती देताना तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे म्हणाले, जलकुंडांमुळे आता ५२ हजार लिटरपर्यंत संरक्षित पाणी उपलब्ध होत आहे. या साठ्याचा सिंचन आणि फवारणीसाठी मोठा उपयोग होत असून, शेतकऱ्यांना थेट फायदा मिळत आहे. चिपळूण तालुक्यात आतापर्यंत ६० जलकुंड पूर्ण झाली असून, सुमारे १० लाख रुपयांचा खर्च केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular