23.4 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeChiplunनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात, शरद पवार गटाची बैठक

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात, शरद पवार गटाची बैठक

निवडणुकीच्या तयारीसाठी आणि नियोजनासाठी पक्षाचा पार्लमेंटरी बोर्डदेखील जाहीर झाले आहे.

चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आज झालेल्या बैठकीत केला आहे. या निर्णयामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाचे पार्लमेंटरी बोर्डदेखील तयार केले आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार की, सर्व पक्ष नशीब आर्जमावणार याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. त्यामुळे चिपळूणची जागा आघाडीतील कोणत्या पक्षाला मिळणार, यावर कोणतीही चर्चा झालेली नसतानाच एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. जनतेच्या आग्रहामुळे हा निर्णय घेत असल्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी जाहीर केले आहे. शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत कदम यांच्यापुढे पक्षाने निवडणूक लढवण्याबाबत आग्रह धरला होता. बैठकीत नगराध्यक्षपदासाठी सर्वानुमते नावही निश्चित केले आहे. चिपळूण शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांचे समाधान करण्यासाठी रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार पक्ष नगराध्यक्ष निवडणूक लढवणार आहे, असे या वेळी ठरवण्यात आले.

निवडणुकीच्या तयारीसाठी आणि नियोजनासाठी पक्षाचा पार्लमेंटरी बोर्डदेखील जाहीर झाले आहे. या बोर्डात रमेश कदम, सुचय आण्णा रेडीज, शिरीष काटकर, सतीश खेडेकर, रतन पवार, सावित्रीताई होमकळस, छाया खातू, अजमल पटेल, भाई गुढेकर, सुरेश चिपळूणकर, हिंदुराव पवार, डॉ. रहिमत जबले, संजय तांबडे, मोहम्मद पाते, श्रीनाथ खेडेकर आणि अफजल कच्छी यांचा समावेश आहे. हा बोर्ड निवडणुकीची संपूर्ण रणनीती ठरवून समन्वयाने अंमलबजावणी करणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

आघाडीबाबत सकारात्मक – चिपळूण येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या पक्षांसोबत आघाडीबाबत सकारात्मक भूमिका जाहीर केली. स्थानिक पातळीवर योग्य राजकीय समीकरणे साधून विरोधी पक्षांना शह देण्यासाठी आणि पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष सज्ज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular