23.4 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriसंगमेश्वरातील मतदारयादीत मोठा घोळ ! महाविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा

संगमेश्वरातील मतदारयादीत मोठा घोळ ! महाविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा

देवरुखची मतदार यादी पाहता सुमारे ३०० मतदारांची नावे उडवण्यात आली आहेत.

निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असल्याने या कार्यक्रमांतर्गत प्रभागानुसार मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीची पडताळणी केली असता, महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. ही बाब पुराव्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या मतदार यादीमध्ये अनेक घोळ घालण्यात आले आहेत. ठराविक पक्षातील नेत्यांनी निवडणूक यंत्रणेला हाताशी घेऊन हा घोळ घातला असल्याचा आरोप रवींद्र माने यांनी केला आहे. या यादीमध्ये नोंदवण्यात आलेली मतदारांची नावे खोट्या आधारकार्डचा आधार घेऊन नोंदवली आहेत, असे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही उदाहरणे देत सांगितले. ज्या मतदारांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले, त्या मतदारांची नावे डिसेंबर २०२४ या एकाच महिन्यात तब्बल ७४ नावे उडवण्यात आली आहेत. अशाप्रकारे संपूर्ण देवरुखची मतदार यादी पाहता सुमारे ३०० मतदारांची नावे उडवण्यात आली आहेत.

इतकीच बोगस मतदारांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, असे आरोप करण्यात आले असून याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी, संगमेश्वर तहसीलदार, निवडणूक नायब तहसीलदार, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दाद मागितली आहे. या यादीतील त्रुटी दूर करून सुयोग्य यादी बनवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मोठे जन आंदोलन उभारू, असा इशारा माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी दिला आहे. मतदार यादीतील घोळ हे जाणून बुजून केले आहेत, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. हा संपूर्ण घोळ ठराविक प्रभागांमध्ये जाणूनबुजून आहे. घालण्यात आला या मतदार यादीतील अनेक मतदारांची नावे वर्षानुवर्षीच्या ज्या प्रभागामध्ये आहेत.

यातील एका कुटुंबामधील ठराविक व्यक्तींची नावे अन्य प्रभागात टाकण्यात आली आहेत. हे देखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे. एकाच प्रभागामध्ये १२२ हरकती घेण्यात आल्या आहेत. हरकती घेण्याची मुदत शुक्रवारी संपली असल्यामुळे अनेकांना आपल्या हरकती मांडता आल्या नाहीत. या संपूर्ण घोळ घातलेल्या यादीतील बीएलओ व कर्मचारी यांची सखोल चौकशी व्हावी, याचप्रमाणे बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या संबंधित सेंटर यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे, असे माजी राज्यमंत्री माने यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसेना उबाठाच्या महिला संघटक नेहा माने, महाविकास आघाडीमधील युयुस्तू आर्ते, उबाठाचे तालुका प्रमुख नंदादीप बोरुकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नीलेश भुवड आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular