24.5 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSindhudurgदिवाळीतच देवगड हापूसची पहिली पेटी वाशीकडे रवाना….

दिवाळीतच देवगड हापूसची पहिली पेटी वाशीकडे रवाना….

बागायतदारायांच्या कलम बागेत पावसाळ्यादरम्यान मोहोर आला होता.

वेळेआधीच यंदाच्या आंबा हंगामाचा मुहूर्त झाला आहे. तालुक्यातील पडवणे येथील एका आंबा बागायतदार शेतकऱ्याची सुमारे पाच डझनाची आंबा पेटी सोमवारी वाशी फळबाजारात रवाना झाली आहे. येथील खासगी आराम बसने ही पेटी फळबाजारात पाठवण्यात आली. उद्या (ता.२१) लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर ही पेटी फळबाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. यंदा मेच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाने झोड उठवल्याने तसेच अवकाळीला जोडूनच मॉन्सून सक्रिय झाल्याने आंबा हंगाम वेळेआधी गुंडाळावा लागला होता. मात्र, असे असले तरी यंदा ऑक्टोबरमध्येच देवगड हापूस वाशी फळबाजारात रवाना झाला आहे. तालुक्यातील पडवणे भागातील एका आंबा बागायतदारायांच्या कलम बागेत पावसाळ्यादरम्यान मोहोर आला होता.

आलेला मोहोर पावसापासून सुरक्षित करून जोपासना करण्यात आली होती. त्याला आता चांगली फळधारणा झाली आहे. त्यातील सुमारे पाच डझन आंबे सोमवारी लाकडी पेटीमधून वाशी फळबाजारात पाठवण्यात आले. आंबा पेटीची विधिवत पूजा करून यंदाच्या हंगामाचा मुहूर्त करण्यात आला. ऐन दिवाळी दिवशीच मुंबईत सोमवारी हापूस आंबा पेटी रवाना झाली आहे. ऐन दिवाळीतच हापूस आंबा फळबाजारात रवाना झाल्याने तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच त्याची विक्री होणार असल्याने त्याला काय भाव मिळणार, याचेही बागायतदारांमध्ये कुतूहल आहे.

RELATED ARTICLES

Most Popular