जीएसटी कपातीनंतर वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यात दसरा ते दिवाळी या काळात एकूण ३ हजार ३७९ वाहनांची विक्री झाली असून, तशी नोंदणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. विशेष म्हणाजे दसऱ्याच्या एकाच दिवशी सुमारे १ जार ३२९ वाहनांची नोंदणी झाली आहे. यातून सुमारे १४ कोटींचा महसूल शासनाला मिळाला आहे. यंदा दिवाळीसाठी शासकीय कार्यालयांना १८ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत नऊ दिवस सुट्टी होती. त्यामुळे दिवाळीच्या मुहुर्तावर वेळेवर गाडी घरात यायला हवी, या उद्देशाने अनेकांनी १५ ऑक्टोबरपासूनच वाहन खरेदी करण्यास सुरवात केली. या कालावधीत जिल्ह्यात २ हजार ५० वाहनांची नोंदणी या कार्यालयाकडे करण्यात आली तर दसऱ्याच्या मुहुर्तावर एकाच दिवशी १ हजार ३२९ विविध वाहनांची नोंदणी या कार्यालयात झाली होती.
केंद्र शासनाने वाहनांवरील जीएसटी कपात केल्याचा मोठा फायदा वाहन खरेदीला झाला आहे. ग्राहकांनी त्याचा फायदा उचलत मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली. दिवाळीच्या मुहुर्तावर २ हजार ५० वाहनांची नोंदणी झाली तर दसऱ्याच्या मुहुर्तावर १ हजार ३२९ अशी ३ हजार ३७९ वाहनांची नोंदणी येथील आरटीओ कार्यालयात झाली. या नोंदणी शुल्कातून शासनाला सुमारे १४ कोटीचा महसूल दसरा आणि दिवाळीच्या सणाला मिळाला आहे.
फॅन्सी नंबरप्लेटमधून २९ लाखांचा महसूल – ऑनलाईन पैसे भरून दिवाळीत घेतलेल्या नव्या २७४ वाहनांच्या आकर्षक नंबरच्या माध्यातून आरटीओ कार्यालयाला २८ लाख ९३ हजारांचा महसूल मिळवून दिला. अनेक वाहनधारक चांगला नंबर मिळवण्यासाठी अगदी पाच हजारांपासून ते लाख रुपयेदेखील भरण्यासाठी तयार असतात.

 
                                    