25.2 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriबळीराजाचे हित लक्षात घेऊन कर्जमाफी - मंत्री उदय सामंत

बळीराजाचे हित लक्षात घेऊन कर्जमाफी – मंत्री उदय सामंत

सव्हें करून सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महायुतीच्या सरकारने बळीराजाला ताकद देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. बळीराजाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे आणि याबद्दल समाधानी आहोत. रत्नागिरीसह कोकणातही या पावसाचा फटका बसला आहे. भाताबरोबरच कापलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सव्हें करून सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मच्छीमारांचाही यामध्ये समावेश केला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यानी दिली. रत्नागिरी येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत मंत्री सामंत म्हणाले, “पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे आदी भागांमध्ये भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांबरोबरच कापलेल्या भाताचाही सव्र्व्हे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकसभेनंतर आम्ही विधानसभेला सामोरे गेलो. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी एक वचननामा तयार केलेला होता.

शेतकऱ्यांना संकटाच्या काळात कर्जमाफी देऊन त्यांच्यावरील संकट दूर करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्जमाफी करून ही भूमिका एकनाथ शिंदे यांनी दिली होती आणि आज मला सांगताना समाधान आहे की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, त्यांनी व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बळीराजासाठी दिलेला शब्द पूर्ण केला हे आपल्या सगळ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.” ते म्हणाले, “कर्जमाफीची तारीख दिलेली आहे, त्या तारखेपर्यंत कर्जमाफी नक्की होईल. याचे परिणाम काय होतील, तर ज्या पद्धतीने दुष्काळ झाला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद महाराष्ट्रातल्या बळीराजाला मिळणार आहे. कोकणामध्ये पाऊस सुरू आहे. त्या पावसाच्या संदर्भामध्ये देखील सकाळी माझे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले. त्याचा देखील नुकसानीचा सर्व्हे करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

“उपमुख्यमंत्री शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे सरकार चालवत असताना बळीराजाचे हित कशामध्ये याचा विचार करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळाला पाहिजे, यासाठीच आम्ही सरकार चालवतोय आणि त्याची प्रचिती महाराष्ट्रातल्या बळीराजाला आल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना सामंत म्हणाले, “खासदार नारायण राणे यांच्याशी मी आज सकाळीच चर्चा केली. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुती व्हावी यासाठी आम्ही दोघे आग्रही आहोत. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडून लवकरच घोषणा होईल, असे स्पष्ट केले. खासदार नारायण राणे व आपण युती करून निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत आहोत. तशी भूमिका स्पष्ट केली असून, लवकरच वरिष्ठ याबाबत योग्य तो निर्णय घेतील.”

आंदोलनापूर्वीच कर्जमाफीची समिती गठित – माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन करायच्या अगोदरच कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केली होती. समितीचे गठन केले होते. पूरस्थिती निर्माण झाली त्याला देखील ३२ हजार आठ कोटींचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे हेदेखील सरकारने दाखवून दिले आहे, असे सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular