19.6 C
Ratnagiri
Sunday, November 16, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeDapoliअवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात 'पाणी'

अवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात ‘पाणी’

वन्यप्राणी आणि पाखरे यांच्या हल्ल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे.

ऑक्टोबरमध्ये रोजच धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने मंडणगड तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले असून, शेतकऱ्यांचे स्वप्नच पाण्यात भिजवल्याचे चित्र कोकणात आहे. खरीप हंगामातील भात आणि नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सततच्या पावसामुळे थंडी लांबल्याने आंबा, काजू आणि सुपारी बागायती पिकांनाही फटका बसला आहे. झाडांना फुटलेली पालवी सतत ओलसर राहिल्याने कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तापमानात अचानक गारवा आल्याने फुलोरा आणि पिकधारणेचा पहिला टप्पा बाधित झाला आहे. यावर्षी मॉन्सूनने मे महिन्यातच हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतीचे नियोजन कोलमडले. सध्या कापणीस आलेल्या पिकांवर पावसाचे संकट कायम असल्याने उभी पिके वाया जाण्याची भीती आहे. विशेषतः पानथळ भागातील शेतकऱ्यांचे नुकसान अधिक गंभीर असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.

कृषी विभागाचा अहवाल – मंडणगड तालुक्यात यंदा खरीप हंगामात सुमारे २,९०० हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली. कृषी विभागाने केलेल्या नुकसानीच्या सव्र्व्हेनुसार, सुमारे ८०० शेतकरी बाधित १६६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी १५० हेक्टर भात आणि इतर पिके, तर १६ हेक्टर बागायती पिकांचे नुकसान नोंदवले गेले. वनविभागाकडून मात्र वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही. स्थानिक शेतकरी म्हणण्यानुसार, दरवर्षी शेती करतो; पण पाऊस, प्राणी, खर्च आणि मजूर टंचाई सगळेच वाढले आहे. सरकारकडून योग्य मदत आणि नैसर्गिक वातावरणात समतोल राहिला नाही तर पुढील वर्षी पीक घेणे कठीण होईल.

वन्यप्राण्यांचा सततचा त्रास – अवकाळी पावस्राबरोबरच रानडुकरे, माकडे, गवे यासारख्या वन्यप्राणी आणि पाखरे यांच्या हल्ल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. शासनाच्या नियमांनुसार, वनविभागाकडून पंचनामे होणे अपेक्षित असले तरी स्थानिक पातळीवर जागृतीचा अभाव यामुळे बहुतांश प्रकरणांमध्ये पंचनामे होत नाहीत. तालुक्यात वनविभागाचे अधिकृत कार्यालय नसल्याने आणि वनविभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे १०९ गावांपर्यंत वेळेत पोहोचणे जवळपास अशक्य बनले आहे.

उत्पादन घट आणि मनुष्यबळाचा अभाव – गेल्या काही वर्षांत शेतीखालील जमिनीचे क्षेत्र कमी होत असून, मनुष्यबळाचा अभाव, लहरी हवामान, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीबद्दल नाउमेदपणा वाढला आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन काही प्रमाणात टिकले असले तरी जमिनीखालील शेतीक्षेत्रात दरवर्षी घट होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular