24.5 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhedकुंभार्ली घाटात वाघाचे दर्शन…

कुंभार्ली घाटात वाघाचे दर्शन…

एक कोयना आणि दोन चांदोलीच्या जंगलात आहेत.

तालुक्यातील कुंभार्ली घाट परिसरातील धनगरवाडीतील ग्रामस्थांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चौथ्या वाघाच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होण्यास पुष्टी मिळाली आहे. या पट्टयात चौथा वाघ असल्याचे वनविभागाकडूनही यापूर्वीच मान्य करण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात अधिकृतपणे तीन वाघ आहेत. त्यातील एक कोयना आणि दोन चांदोलीच्या जंगलात आहेत. चौथा वाघ चिपळूणमध्ये अधूनमधून दर्शन देतो. वनविभागाने चौथ्या वाघाचे अस्तित्व मान्य केले आहे. काही महिन्यापूर्वी पोफळी धनगरवाडी आणि तळसरच्या जंगलात पट्टेरी वाघाने गुरांची शिकार केल्याची घटना घडली होती.

त्यानंतर शिरगावच्या जंगलातही त्याच्या पायाचे ठसे आढळले होते. या तीन घटनेनंतर वनविभाग सतर्क झाला आणि जंगलातील पाणवठे तसेच वाटांवर कॅमेरे लावले; मात्र या कॅमेऱ्यामध्ये वाघ आढळला नाही. पोफळी गावामध्ये कुंभार्ली घाटात मोठे जंगल आहे. या जंगलात पट्टेरी वाघाचा वावर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये नेहमीच होत होती. पोफळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बबन खरात यांना रविवारी रात्री पट्टेरी वाघ शेतात वावरताना दिसला.

RELATED ARTICLES

Most Popular