24.1 C
Ratnagiri
Wednesday, November 12, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhedखेडमध्ये दोन्ही शिवसेनेच्या सैनिकांमध्ये तुफान राडा व हाणामारी

खेडमध्ये दोन्ही शिवसेनेच्या सैनिकांमध्ये तुफान राडा व हाणामारी

विक्रांत जाधव यांच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला आहे.

खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या एका कंपनीच्या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी चर्चा करण्यासाठी आलेले शिवसेनेचे युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते आ.भास्करशेठ जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करणारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीआधारे पोलिसांनी विक्रांत जाधव यांच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला आहे. दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या. राड्यानंतर खेड आणि परिसरातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, सचिन सुधाकर काते (वय ४०, रा. लोटेमाळ, खेड) यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते लोटे एमआयडीसीमध्ये गेली १० वर्ष विविध कंपन्यांना मजुर पुरविण्याचे काम करतात. २०२१ सालापासून ते लोटे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही काम पाहत आहेत. या परिसरातील कंपन्यांशी ते सातत्याने संपर्कात असतात.

गुरुवारी काय झाले ? – गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवाशी सचिन कालेकर, रोहन कालेकर यांनी विजय केमिकलचे मॅनेजर अनंत महाडीक यांनी कामासंदर्भात बोलावले असल्याचे सचिन काते यांना सांगितले. त्यानुसार सचिन काते आणि अन्य दोघे असे तिघे कंपनीच्या गेटवर पोहचले. मॅनेजर महाडीक यांनी सुरूवातीला वरिष्ठांशी चर्चा करून कळवू असे सांगितले. काही वेळानंतर त्यांनी या तिघांनाही चर्चेसाठी कंपनी कार्यालयात बोलावले. कंपनीच्या कार्यालयात ते चर्चेसाठी गेले.

विक्रांत जाधवांची उपस्थिती – त्यावेळी तेथे विक्रांत भास्कर जाधवः (रा. पागनाका, चिपळूण), सुमित शिंदे (रा. दसपटी, चिपळूण) विवेक आंब्रे (रा. आवाशी, ता. खेड) यांच्या समवेत ७ ते ८ अनोळखी कामगार उपस्थित होते. स्थानिकांना रोजगार द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्यावर चर्चा सुरू असताना अचानक वाद सुरू झाला. आवाज चढले, जणूकाही भांडण सुरू झाले.

स्थानिक म्हणजे काय ? – यावेळी विक्रांत जाधव यांनी ‘तुम्ही स्थानिक म्हणजे काय?’ असा सवाल केला आणि थेट भांडणाला सुरूवात झाली, वादावादी सुरू असताना अचानक प्रकरण हातघाईवर आले. रागाचा पारा चढला आणि विक्रांत जाधव यांनी फिर्यादी सचिन काते यांना मारहाण केली, जीवघेण्याची धमकी दिली असे आरोप फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहेत.

अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न – हे सुरू असतानाच सुमित शिंदे, विवेक आंब्रे व अन्य काही जणांनी बेकायदेशीर जमाव करत सचिन काते यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप फिर्यादीमध्ये काते यांनी केला आहे. त्यानंतर काते यांनी कंपनीतून थेट खेड पोलिस स्थानकात येऊन घडला प्रकार कथन केला. रितसर फिर्याद नोंदविली

विक्रांत जाधवांवर गुन्हा – या फिर्यादीनुसार विक्रांत जाधव, सुमित शिंदे, विवेक आधे यांच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १८९(१), १८९(२), १९०, १९१(२), ११५ (२), ३५२, ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल. केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक जयंत विजय गायकवाड करत आहेत.

राजकारण तापले – शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख आणि जि.प.चे माजी अध्यक्ष व आमदार भास्करशेठ जाधवांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकारणही तापले आहे. न.प.निवडणुका जाहीर झालेल्या असताना हा राडा झाल्याने खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular