22.8 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeChiplunचिपळूण परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

चिपळूण परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

विविध भागांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या

शहरातील पाग बौद्धवाडी येथील रहिवासी विद्याधर जाधव यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी सलग दुसऱ्यांदा हल्ला केल्याची घटना सोमवारी (ता. २२) घडली. त्यांच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी यापूर्वी मोकाट कुत्र्यावरून आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत ते काय उपाययोजना करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष आहे. विद्याधर जाधव हे भोगाळे येथील महावीर मार्केटसमोरील आपल्या शेतात जात असताना परिसरातील भटक्या कुत्र्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एका कुत्र्याने जाधव यांच्या पायाला चावा घेतला. कुत्र्याचे तब्बल पाच दात त्यांच्या गुडघ्याजवळ रूतले. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने कामथे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आवश्यक उपचार व लसीकरण करून त्यांना घरी सोडण्यात आले.

यापूर्वीही शहरातील विविध भागांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. पालिका प्रशासनाने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिका, नागरिक व प्राणीमित्र संस्थांच्या उपस्थितीत येथील सांस्कृतिक केंद्रात बैठक झाली होती; मात्र या बैठकीत अपेक्षित ठोस निर्णय न झाल्याने बैठक अर्धवट राहिली होती. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असून, नगरपालिका प्रशासन यावर कोणती ठोस कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular