23.9 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeChiplunचिपळुणात विचित्र अपघात, तिघे नाल्यात दुचाकीसह कोसळले

चिपळुणात विचित्र अपघात, तिघे नाल्यात दुचाकीसह कोसळले

एक तरुण गंभीर होऊन बेशुद्ध पडला होता.

महामार्गावरील राधाकृष्ण नगर येथील मुत्तपन मंदिरच्या स्वागत कमानीच्या ठिकाणी खोल नाल्यात दुचाकी सह तिघेजण कोसळून अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री ९.१५ वाजता घडली. क्रेनच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. या विचित्र अपघातात तिघेही तरुण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. महामार्गाने शहरातील बहादूरशेख नाका ते डीबीजे महाविद्यालयाच्या दिशेने हे तिघे तरुण एक्टिवा दुचाकीने ट्रिपल सीट चालले होते. अशातच त्यांचा राधाकृष्ण नगर येथील मुत्तपन मंदिरच्या कमानी जवळ येतात दुचाकी वरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्ता सोडून थेट समोरच्या नाल्यात कोसळली. आजूबाजूच्या काही लोकांनी तसेच वाहन चालकांनी हा अपघात बघताच मदतीसाठी धाव घेतली. परंतु नाला इतका खोल होता की त्यातून बाहेर पडणे देखील शक्य नव्हते.

तसेच नाल्याच्या बाजूच्या भिंती उंच असल्याने जखमींना बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या. काही तरुण थेट नाल्यात देखील उतरले होते. नाल्यातून नगरपरिषदेची मोठी पाईप लाईन गेलेली असल्याने या पाईपवर अपटल्याने तरुण जखमी झाले होते. तर एक तरुण गंभीर होऊन बेशुद्ध पडला होता. प्रसंगावधान ओळखून सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार व माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या क्रेनला मदतीसाठी बोलावले आणि त्या तरुणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करून दोघांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले तर एकजण अगोदरच बाहेर आला होता. त्यानंतर नजीकच्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे तिन्ही तरुण चिपळूण शहरातील रहिवासी असून त्यातील दोघेजण शहरातील खेन्ड विभागातील स्थायिक असल्याचे समजते.

RELATED ARTICLES

Most Popular