जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा जिल्हाभरात गुप्त बैठकांना सुरुवात झाल्याचे दृश्य दिसत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवार आपल्या विभागात सक्रिय झाला असून, समोरच्या उमेदवाराची ताकद, कमकुवत बाजू, स्थानिक समकिरणे आणि मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी भेटी घेतल्या जात आहेत. या गुप्त बैठकांमध्ये पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच विश्वासू समर्थक सहभागी होत आहेत. या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती आहे. काही बैठकांमध्ये निवडणूक रणनीतीवर चर्चा होत असून संभाव्य आघाड्या आणि विरोधकांच्या हालचाली यांचा आढावा घेत आहेत.
विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर संभाव्य बंडखोरीची भीती अनेक पक्षांना भेडसावत आहे. त्यामुळे नाराज नेते अपक्ष उमेदवार किंवा बंडखोरांची मनधरणी करण्यासाठीही गुप्त बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी उमेदवार बदल, माघार किंवा युतीबाबतही चर्चा रंगत असल्याचे समजते. जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या अत्यंत तापलेले असून प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक उमेदवार त्यांच्या विरोधकांची ‘पडताळणी’ करत आहेत. म्हणजे, समोरचा उमेदवार कितपत लोकप्रिय आहे, त्याला कोणत्या गटाचा पाठिंबा आहे, प्रचारासाठी किती यंत्रणा उभी आहे, याचं अनुमान घेतलं जात आहे. त्यानुसार प्रचाराची रणनीती आखली जात आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक उमेदवार त्यांच्या विरोधकांची ‘पडताळणी’ करत आहेत. म्हणजे, समोरचा उमेदवार कितपत लोकप्रिय आहे, त्याला कोणत्या गटाचा पाठिंबा आहे, प्रचारासाठी किती यंत्रणा उभी आहे, याचं अनुमान घेतलं जात आहे. त्यानुसार प्रचाराची रणनीती आखली जात आहे. काही मतदारसंघात तर संभाव्य विजय-पराजयाचे गणित आधीच मांडले जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडूनही या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. मात्र, राजकीय पक्षांकडून अधिकृत कार्यक्रम पेक्षा अशा अनौपचारिक आणि गुप्त बैठकांवरच भर दिला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एकूणच, उमेदवारी अर्जाच्या अंतिम टप्प्यानंतर जिल्ह्यातील राजकारण अधिकच रंगत आले असून आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

