24.2 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

रत्नागिरीत पार्किंगच्या जागेत बाग – स्मार्ट सिटी योजना

शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या...

विमान अपघाताच्या चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला...

शनिवारच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, पोलिसांचांही तगडा बंदोबस्त

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक...
HomeMaharashtraबारामतीत काय शिजतयं? शरद पवारांची, पार्थ, जय पवारांसोबत बैठक, रोहित पवारांची ही...

बारामतीत काय शिजतयं? शरद पवारांची, पार्थ, जय पवारांसोबत बैठक, रोहित पवारांची ही उपस्थितीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय जलदगतीने घडामोडी घडत आहेत. शरद पवार ही सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात बारामतीत पवार कुटुंबीयांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. शरद पवारांच्या पुढाकाराने या बैठकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते. शिवाय रोहित पवार ही प्रत्येक बैठकीत असल्याचं दिसून आले आहेत. आज गुरूवारी ही एक महत्वाची बैठक बारामतीत पार पडली. त्यामुळे या बैठकीत नक्की काय झालं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात आज सलग दुसऱ्या दिवशी पवार कुटुंबाची महत्त्वाच्या बैठक पार पडली. त्यांच्या या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. काल देखील अशाच प्रकारे दीर्घकाळ चर्चा झाली होती. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आजच्या बैठकीत शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, राजेंद्र पवार, पार्थ पवार, जय पवार आणि आमदार रोहित पवार यांचा सहभाग होता. सोबतच विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे कालच्या बैठकीला पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवार यांच्या बहिणी विजया पाटील ही उपस्थित होत्या. बैठकी बाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचे भव्य स्मारक तयार करायचे आहे. या बैठकी या स्मारकाच्या प्राथमिक आराखड्याच्या मॅप तयार करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. अजित पवारांच्या आठवणीत संग्रहालय तयार केले जाणार आहे. संग्रहालयात अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या वस्तू ठेवल्या जाणार आहेत. अजित पवारांची भाषण या ठिकाणी संग्रहालयात लोकांसाठी उपलब्ध असतील असा ही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत काही राजकीय चर्चा झाली का याचा कोणताही संदर्भ बाहेर आला नाही. पण पवार कुटुंबामध्ये नक्कीच काही तरी शिजत आहे याची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular