कर्णधार विराट कोहलीची इच्छा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पूर्ण केली आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमात वादग्रस्त सॉफ्ट सिग्नल नियम हटवण्याचा निर्णय अखेर बीसीसीआयने घेतला आहे. आयपीएलच्या होणार्या 14 व्या मोसमात ऑन फील्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल डिसीजन वापरता येण्यावर बंधन आहे. चौथ्या टी-२० सामन्यानंतर विराट कोहली अलिकडे इंग्लंडविरोधात झालेल्या सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयावर प्रचंड नाराज झाला होता.
झाले असे कि, इंग्लंडच्या डेविड मलानने सूर्यकुमार यादवची कॅच पकडली, त्यावेळी रिप्लेमध्ये चेंडूचा स्पष्टपणे जमिनीला स्पर्श झाला असल्याचं स्पष्ट दिसत होतं. परंतु, तिसऱ्या पंचांनी ठोस पुरावा नसल्याचं सांगत केवळ सॉफ्ट सिग्नलच्या आधारे सूर्यकुमारला बाद केलं. त्यावरुन प्रचंड नाराज असलेला विराटने सांगितले कि, जर स्वत: खेळाडूला माहित नसेल कि, त्याने कॅच पकडली आहे की नाही, तर मैदानावरील पंच आउट असा सॉफ्ट सिग्नल कसे काय जाहीर करू शकतात! सॉफ्ट सिग्नल निर्णायकच कशासाठी असायला हवा. मला हे अजूनही कळून येत नाही की मैदानावरील पंच सॉफ्ट सिग्नल देताना मला माहित नाही असं का म्हणून शकत नाहीत? अशी विराटने टीका केली होती. अशा नियमांना आयसीसी बदलायला कायम उशीर करते, परंतु बीसीसीआय या प्रकरणी एक पाऊल पुढे सरकल्याने आयपीएलच्या 14 व्या हंगामात मैदानी अंपायर सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करू शाणार नाहीत. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेऊन सॉफ्ट सिग्नल हटवला आहे
वादग्रस्त सॉफ्ट सिग्नल निर्णय हटवण्याबद्द्दल कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केलीली परंतु, आता हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेदरम्यान हा निर्णय वादग्रस्त ठरलेला. मैदानी अंपायर्सच्या एका चुकीमुळे भारताला चांगलाच फटका बसला होता. कर्णधार विराट कोहली या प्रकरणावर खूप नाराज झाला होता. तसंच या निर्णयावर अनेक आजी-माजी खेळाडूंनीही विरोघ दर्शवून टीका केली होती.
बीसीसीआयने आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीमध्ये मॅच प्लेइंग कंडिशन्स अर्थात नवीन हंगामासाठी खेळल्या जाणार्या सामन्यांसाठी काही नियम अटीमध्ये बदल केले आहेत. यामध्ये बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयापैकी अतिशय महत्त्वाचा ठरलेला निर्णय म्हणजे सॉफ्ट सिग्नल काढून टाकण्याचा निर्णय हाच होय. यंदाच्या मोसमातील आयपीएल 2021 च्या हंगामात कोणतेही मैदानी अंपायर तिसर्या अंपायरकडे कोणताही निर्णय सॉफ्ट सिग्नलच्या आधारे सांगू शकत नाहीत. थर्ड अंपायर त्यांच्या योग्य ज्ञान, समजुतीनुसार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेचं योग्य तो निर्णय देतील, जेणेकरून कोणत्याच संघांचे नुकसान न होता नक्की फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.