25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeEntertainmentअक्षयकुमारच्या गोरखा चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रसिद्ध, एक मोठी चूक..

अक्षयकुमारच्या गोरखा चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रसिद्ध, एक मोठी चूक..

गोरखा हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे.

अक्षयकुमार त्याच्या नवनवीन संकल्पनांच्या आधारावर निर्मिती करणारे चित्रपट कायमच चर्चेत असतात. सध्या चर्चेत असलेला त्याचा ‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे.

कार्डोजो यांनी १९६२, १९६५ साली झालेले युद्ध आणि १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये अभेद्य  कामगिरी बजावली होती. नुकतच सोशल मीडियावर अक्षय कुमारने गोरखा चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. त्याने एक पोस्टर शेअर करत, कधी कधी तुमच्या समोर अशा कथा येतात, ज्या तुम्हाला प्रेरणादायी वाटतात आणि त्यावर मनापासून काम करण्याची इच्छा निर्माण होते, असे लिहिले आहे.

अक्षयच्या या आगामी चित्रपटातील हे पोस्टर गोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर करून, हे पोस्टर शेअर करतेवेळी त्यांनी त्यामधील एक गंभीर चूकीची जाणीव अक्षयकुमारसह सर्वांना करून दिली आहे.

मेजर माणिक एम जोली यांनी ट्वीत करत, त्यामध्ये अक्षय कुमारला टॅग करून लिहिले कि, प्रिय अक्षय कुमार, मी एक माजी गोरखा अधिकारी असल्यामुळे या चित्रपटाची तुम्ही निर्मिती केल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे विशेष आभार मानतो. पण या पोस्टर संदर्भात एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील कुकरी ही योग्य नाही आहे, ती व्यवस्थित दाखवावी.  कुकरी हे एक धारदार शस्त्र आहे परंतु त्याची धार ही आतील बाजूस असते. ही तलवार नसून हि कुकरी आहे,  जिचा वार आतील बाजूने होतो. मी रेफरन्ससाठी तुम्हाला कुकरीचा एक फोटोही सोबत पाठवत आहे. धन्यवाद, असे लिहिले आहे.

अक्षय कुमारने मेजर माणिक एम जोली यांनी ही चूक दाखवल्यानंतर तातडीने त्यावर प्रतिक्रिया देत, आदरणीय, मेजर जोली जी,  तुम्ही ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. या चित्रपटाचे चित्रिकरण करतेवेळी आम्ही याची जरूर काळजी घेऊ. ‘गोरखा’ हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.  या चित्रपटातून खरे वास्तव लोकांच्या समोर आणण्यासाठी कोणत्याही सूचनांचे स्वागत केले जाईल,  अशी प्रतिक्रिया अक्षय कुमारने दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular