30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...

माजी मंत्री बच्चू कडूंचा निवडणूक आयोगासह ईव्हीएमवर हल्लाबोल

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू...
HomeKhedऑडिओ क्लिपचा विषय आमच्यासाठी कधीच संपला आहे - आमदार योगेश कदम

ऑडिओ क्लिपचा विषय आमच्यासाठी कधीच संपला आहे – आमदार योगेश कदम

मागील महिन्यामध्ये व्हायरल झालेल्या कथित ऑडियो क्लिपमुळे शिवसेना पक्षश्रेष्ठी रामदास कदम यांच्यावर नाराज असण्याच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्याला सुद्धा रामदास कदम हजर नव्हते, त्यामुळे नाराजगीच्या चर्चाना अजूनच उधाण आलेले.

यानंतर रामदास कदम यांच्या विधान परिषदेच्या पदावरून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. पण, आता या सर्व नाराजगीच्या नाट्यावर रामदास कदम यांचे चिरंजीव आणि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना रामदास कदम यांच्या विधान परिषदेच्या जागेबद्दल सूचक वक्तव्यं केलं असून त्यामध्ये ते म्हणाले कि, वयाच्या १८ व्या वर्षापासून रामदास कदम यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून कामे केलेली आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच रामदास कदम यांना शिवसेनेचे नेतेपद दिले होते. उरला प्रश्न त्या खोट्या व्हायरल ऑडिओ क्लिपचा, तर रामदास कदम यांनी स्वतः त्या ऑडिओ क्लिपबाबत सुस्पष्ट खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले आहेत कि, ऑडिओ क्लिपचा विषय आमच्यासाठी कधीच संपला आहे,  त्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याच्या केवळ अफवा आहेत, नाराजगीचा काहीच प्रश्न उद्भवत नाही.

उद्धव ठाकरेंचे आमच्यावर खरं प्रेम आहे आणि आदित्य ठाकरे यांचे आमच्याशी विशेष असे नाते आहे. आमच्या चांगल्या संबधांमध्ये विरोधकांनी वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला, पण, त्यामध्ये त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत,  असं योगेश कदम हे ठामपणे म्हणाले.

योगेश कदम पुढे म्हणाले की,  शिवसेनेने आतापर्यंत रामदास कदम यांना खूप दिलं आहे. रामदास कदम यांनी देखील पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षासाठी झोकून काम केल आहे. परंतु, विधान परिषदेचं तिकीट नेमके कुणाला द्यायचं किंवा नाही द्यायचं हा अंतिम निर्णय सर्वस्वीपणे उद्धव ठाकरे  त्यांचा असेल आणि तो जो काही असेल तो आम्हाला मान्यही असेल.

RELATED ARTICLES

Most Popular