शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव सध्या विविध प्रकरणामध्ये चर्चेत येत असल्याचे निदर्शनास येत आहे. काल एका व्हिडियोमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाजाची नक्कल करताना दिसून आलेत तर आज यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
देशात अवास्तव वाढलेली महागाई आणि ५ वर्षापूर्वी अचानक केलेल्या नोटबंदीच्या मुद्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. खेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने काही केले आहे का? असे २०१४ साली केलेल्या भाषणात मोदींनी विचारले होते. तेव्हा लोकही म्हणाले होते कि, काँग्रेसने काहीच केले नाही. भोळ्या जनतेने मोदींना पंतप्रधान पदी निवडून दिले.
मात्र देशाची सत्ता हाती येताच मोदींच्या नेतृत्वा खालील भाजपा सरकारने देशातील एक-एक गोष्ट हळूहळू विकायला सुरुवात केली आहे. भोळ्या लोकांनी त्यांना निवडून दिले पण त्यांनी तर अख्खा देशच विकायला काढला. आता लोकही त्यांना म्हणत आहेत कि, राजा आत्ता विकणं बंद कर. भाजपापेक्षा काँग्रेस बरे होते अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याचे जाधव म्हणालेत.
भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाजाची केलेल्या मिमिक्रीमुळे उपस्थितांना हसू आवरणे अशक्य झाले. महागाईच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी भाजपवर सडाडून टीका केली. २०१४ साली महागाईवर भाजपने अशे काही वक्तव्य केले होते कि, आणि ते आपले मुद्दे आक्रमकपणे आणि तेवढेच सऱ्हाईतपणे मांडत होतेत. त्याच मुद्द्यावरून त्यांची सत्ता आली, मात्र आता सध्याची परिस्थिती काय आहे?
महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली असून त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलचे, इंधनाचे दर बेसुमार वाढले आहेत. लोकांना गॅस घेणे परवडत नाही आहे. मोदींनी जाहीर केलेल्या उज्वला योजनेमध्ये लोकांना वाटले फूकट मिळत आहे म्हणून अनेकांनी गॅस कनेक्शन घेतले. मात्र आता सरकारने सबसीडी बंद केल्याने पुन्हा एकदा गॅस बंद करून, लोकांवर चूली पेटवण्याची वेळ आल्याचा घणाघाती टोला जाधव यांनी लगावला आहे.