29.8 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriउजगाव मार्गावर बिबट्याकडून दुचाकीस्वारांचा थरारक पाठलाग

उजगाव मार्गावर बिबट्याकडून दुचाकीस्वारांचा थरारक पाठलाग

हल्ली ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये सुद्धा वन्य हिंस्र पशू वाडीवस्तीत येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात असल्याने, वन्यजीवांचा आसराच मोडल्याने ते वस्तींमध्ये शिरकाव करू लागले आहेत. त्याचप्रमाणे भूक भागविण्यासाठी पाळीव प्राणी तर काही वेळा मानवी हल्ल्यांचे प्रमाण सुद्धा अधिक प्रमाणात वाढले आहे.

संगमेश्वरातील माभळेकडून उजगावकडे जाणाऱ्या मार्गावर दबा धरून बसलेला बिबट्याने गुरुवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास विलास कानसरे आणि निलेश कानसरे उजगावकडे जात असताना जंगलात दुचाकीच्या मागे बसलेल्या विलास कानसरेवर झेप घेतली. बिबट्याने त्यांच्या पायावर हमला करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी चालवत असलेल्या निलेशने न घाबरता दुचाकी तशीच वेगाने पळविल्याने मागे बसलेल्या विलासचे प्राण वाचले.

पायावर हल्ला करूनसुद्धा, तेवढ्यावरच न थांबता त्या दुचाकीस्वारांचा बिबट्याने उजगाव गवळीवाडी पर्यंत सतत पाठलाग केला. परंतु, हा परिसरामध्ये माणसांचा वावर जाणवल्याने बिबट्या तेथून निघून गेला. आणि या दोन्ही दुचाकीस्वारांचे प्राण वाचले.

या परिसरामध्ये दिवसाढवळया वारंवार बिबट्याचा वावर होत असल्याने ग्रामस्थांमध्ये एक प्रकारचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ली दिवस लवकर मावळतो, त्यामुळे काळोख लवकर होतो. काळोख पडल्यानंतर,  ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. त्यातच आता बिबट्याकडून दुचाकीस्वारांचा असा थरारक पाठलाग करण्याचा प्रकार घडल्याने गावामध्ये बिबट्याची दहशत आणखीनच वाढली आहे.

ग्रामस्थांकडून लवकरात लवकर या बिबट्याला पकडण्याची मागणी केली जात आहे. लहान मुले, वयोवृद्ध महिला यांचे भीतीमुळे घरातून बाहेर पडणे कठीण बनले आहे. त्यामुळे लवकरच या बिबट्याला वनविभागाने जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular