26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedकशेडी घाटात झालेल्या अपघातात चालक जागीच गतप्राण

कशेडी घाटात झालेल्या अपघातात चालक जागीच गतप्राण

मुंबई-गोवा महामार्गावरील  कशेडी घाटात एका अवघड वळणावर रसायन वाहू टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात केबिनमध्ये अडकून पडल्याने चालकाचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर खेड पोलिस, कशेडी वाहतूक पोलीस आणि मदत ग्रुपच्या सदस्यांनी क्रेनच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांत चालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टँकर चालक वसीम हा आपल्या ताब्यातील टँकर क्रमांक एम.एच.०४ जे के ७७१७ घेऊन गुजरात मधील वापी येथून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत हायड्रोक्लोरिक ॲसिड हे रसायन घेऊन निघाला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तो महामार्गावरील कशेडी घाट उतरत असताना आंबा स्टॉप येथील अवघड वळणावर त्याचा टँकरवरील ताबा सुटल्याने तो टँकर गटारात पलटी झाला. या अपघातात चालक वसीम हा केबिनमध्ये अडकून पडल्याने त्याचा जागीच गतप्राण झाला.

अपघाताची खबर मिळताच कशेडी वाहतूक पोलीस टॅप चे सहाय्यक पोलीस फौजदार बोडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची खबर खेड पोलिसांना मिळताच खेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी रवाना झाले.

अपघाताची खबर मिळताच, खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आणि त्याचे सहकारीही सहकार्यासाठी कशेडी घाटामध्ये पोहचले. टॅंकरचा चालक वसीम याचा केबिनमध्ये अडकलेला मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. अपघातस्थळी क्रेन आल्यानंतर पोलीस व मदत ग्रुपच्या सदस्यांनी क्रेनच्या सहाय्याने सुमारे दोन तास प्रयत्न करून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

महामार्गावर रसायनवाहू टँकर पलटी झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालेले परंतु, या टँकर मधील हायड्रोक्लोरिक ॲसिड हे ज्वलनशील नसल्याने मोठा अनर्थ टळला असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र तरीही खबरदारी म्हणून आणि आगीशी सबंधित काही घडू नये म्हणून अपघातस्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular