28.9 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

राज्यातील मत्स्य उत्पादनात यावर्षी सर्वाधिक म्हणजेच ४७...

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...
HomeKhedकारच्या बोनेटमध्ये नाग, चालकाची भीतीने गाळण

कारच्या बोनेटमध्ये नाग, चालकाची भीतीने गाळण

प्रवास म्हटला कि, त्यासोबत अनेक चांगल्या वाईट आठवणी जोडलेल्या असतात. काही अनुभव तर आयुष्यात कधीही विसरता येणार नाही असे असतात. असाच काहीसा अनुभव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका व्यक्तीला आला आहे.

खेड तालुक्यातील सुखदर येथील दीपक घाडगे हे आपली चारचाकी घेऊन खेड शहरात यायला निघाले होते. कारच्या रेडिएटरमध्ये पाणी आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी कारचा बोनेट उघडला असता त्यांना कारच्या बोनेटमध्ये नाग बसलेला दिसून आला. बोनेटमधील नागाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र घाबरलेला तो नाग इंजिनच्या आतमध्ये कुठेतरी जाऊन बसला. इतर वेळी सुद्धा साप म्हटलं कि, घाबरून पळता भुई थोडी होते आणि समोर नागाचे दर्शन झाल्यावर काय अवस्था झाली असेल!

घाडगे यांच्या कारच्या बोनेटमध्ये चक्क नाग निघाल्याने त्यांची चांगलीच भीतीने गाळण उडाली. इंजिनच्या आतमध्ये लपलेल्या नागाला बाहेर काढण्यासाठी घाडगे यांनी बोनेटमध्ये पाणी मारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते आपली चारचाकी घेऊन दापोली-खेड मार्गावरील दस्तुरी येथे असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आले. या ठिकाणी त्यांनी कारची सर्व्हिसिंग करणाऱ्या युवकाला गाडीच्या बोनेटमध्ये नाग कुठेतरी खाली लपला असल्याचे सांगून पाणी मारण्यास सांगितले. मात्र सर्व्हिसिंग करण्यारा युवकही नागाला घाबरल्यामुळे त्याने पाणी मारण्यास नकार दिला.

त्यानंतर मग घाडगे यांनी खेड येथील सर्पमित्रांची मदत घेण्याचे ठरविले आणि नंबर शोधून त्यांना संपर्क साधून गाडीच्या इंजिनमध्ये नाग दडून बसला असल्याची माहिती. दिली. सर्पमित्र ओंकार शिंदे यांनी दस्तुरी येथे जाऊन गाडीच्या इंजिनमध्ये लपून बसलेल्या नागाला शिताफीने पकडून जंगलात सोडून दिले.

RELATED ARTICLES

Most Popular