26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedभोस्ते घाटातील उतारात ट्रकचा अपघात, चालक जागीच गतप्राण

भोस्ते घाटातील उतारात ट्रकचा अपघात, चालक जागीच गतप्राण

मागील आठवड्यामध्ये सुद्धा भोस्ते घाटात दोन वेळा भीषण अपघात घडून आले होते.

लोटे औद्योगिक वसाहतीमधून रासायनिक गाळ घेऊन मुंबईला जाणार्या ट्रकला भोस्ते घाटामध्ये उतरताना अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शार्प कर्व्हमुळे अवजड वाहनाना वारंवार अपघात होताना दिसत आहेत. मागील आठवड्यामध्ये सुद्धा भोस्ते घाटात दोन वेळा भीषण अपघात घडून आले होते. त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून, जीवितहानी सुद्धा झाली होती.

सोमवारी सांयकाळी ४ च्या सुमारास हा अपघात घडला असून, त्यामध्ये ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. भोस्ते घाटातील उतरतील अवघड वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण अचानक सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये चालकसुद्धा केबिनमध्ये अडकून पडल्याने जागीच गतप्राण झाला आहे.

हजार्ड्स वेस्ट घेऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर हा अपघात झाला. हा ट्रक हा घाटातील संरक्षक कठड्याला धडकला आणि ट्रकचा चक्काचूर झाला. यावेळी ट्रक चालक नबी सरवर वय ५३ हा जागीच ठार झाला.

वारंवार घडत असलेल्या या अपघाताच्या मालिकेमुळे अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यांवरून करण्यावरून पुन्हा राजकारण पेटण्याचे संकेत दिसत आहेत. आधीच जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली भीषण अवस्था आणि त्यामध्ये सुद्धा घडणारे अपघात यामुळे इतर नागरिकांना सुद्धा त्रास सहन कराव लागत आहे. २ ते ३ तास वाहतूकीचा खोळंबा होत असल्याने त्याचा फटका सध्या कोकणवारीवर आलेल्या पर्यटकाना सुद्धा मिळत आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणात मोठ्या प्रमाणात विविध मार्गांनी पर्यटक दाखल होत असल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा होताना दिसत आहे. तर वाहतूक पोलिसांची अवस्था सुद्धा चांगलीच होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular