31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...
HomeRatnagiriजिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये कोटींचा मुद्देमाल जप्त

जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये कोटींचा मुद्देमाल जप्त

जिल्हा राज्य उत्पादन विभागाने एप्रिल २०२१ ते दि. २६ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये केलेल्या कारवाईतून सुमारे ३ कोटी ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैधरित्या सुरु असलेली देशी विदेशी दारू वाहतूक आणि विक्रीवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक व विक्री करताना या विभागाने केलेल्या कारवाईत ५८३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व  गुन्ह्यांमध्ये एकूण मिळून अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १३ वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सागर धोमकर यांनी दिली आहे.

जिल्हा राज्य उत्पादन विभागाने एप्रिल २०२१ ते दि. २६ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये केलेल्या कारवाईतून सुमारे ३ कोटी ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोव्याहुन मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची २ पथके रत्नागिरी-सिंधुदुर्ग सीमेवर सतत तैनात ठेवण्यात आलेली आहेत. अनेक जण अनेक छुप्या मार्गाने सुद्धा विदेशी दारूचा विक्री व्यवसाय करताना दिसतात.

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५८ देशी दारूची दुकाने, २१० परमिट शॉप, ९ वाईनची दुकाने, सूरु आहेत. त्यातील ५० दुकाने परवाना समाप्ती, रिन्युअल केलेला नसल्याने आणि काही भागीदारीच्या भानगडी असल्याने बंद स्वरुपात आहेत. दारूचे सेवन करण्यासाठी ज्याप्रमाणे, वयाची मर्यादा आखून दिलेली आहे त्याचप्रमाणे परवान्याची गरज असते. रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन विभागाने आजतागत नव्वद हजार परवाने दारू विक्रीच्या दुकानांमध्ये दिले आहेत.

जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे धाडी टाकण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्य बळ नसून सुद्धा हे पथक अशा कारवाया करण्यात यशस्वी होत आहे. जसे एक पथक सिंधुदुर्ग बॉर्डर वर असते त्याचप्रमाणे, एक पथक चिपळूण, लांजासह सर्व जिल्ह्यात ठिकठिकाणी गस्त घालत असते.

RELATED ARTICLES

Most Popular