22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraभाजप-शिवसेना युतीवर मोठे भाष्य, खरच होणार का युती?

भाजप-शिवसेना युतीवर मोठे भाष्य, खरच होणार का युती?

मुख्यमंत्र्यांच्या “सौ” रश्मी ठाकरे या उत्तम प्रकारे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात, असे सांगताना सत्तार म्हणाले की, रश्मीताईंची काम करण्याची पद्धत एका हुशार आणि अभ्यासू महिलेसारखी आहे.

शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार एका कामाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेटण्यासाठी राजधानी दिल्लीत गेले होते. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी भाजप-शिवसेना युतीवर मोठे भाष्य केले. नितीन गडकरी देशाच्या राजकारणातले एक चालते-बोलते विद्यापीठ आहे. गडकरीसाहेब हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी एकदा ठरवले की ते कुठेही आणि कसाही पूल बांधू शकतात.

पूल कसा बांधायचा, कसा जोडायचा, त्यासाठी काय काय करायला हवे, याचे त्यांना चांगलेच ज्ञान आहे. देशात त्यांच्या नावाचा मोठा बोलबाला असतो. भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचे त्यांनी मनावर घेतले तर ते उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे जातील आणि त्यांना विनंती करतील. कारण शेवटी भाजप-शिवसेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात, असे सत्तार यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने त्यांच्या वर विरोधी पक्षाची होणारी टीका टिपण्णी खूपच खालच्या दर्जाची होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही त्यांनी विश्वसनीय म्हणून रश्मी ठाकरे यांच्याकडे कारभार सोपवावा, असे विधान अलीकडेच केले होते. त्यापाठोपाठ सत्तार यांचे हे वक्तव्य आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या “सौ” रश्मी ठाकरे या उत्तम प्रकारे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात, असे सांगताना सत्तार म्हणाले की, रश्मीताईंची काम करण्याची पद्धत एका हुशार आणि अभ्यासू महिलेसारखी आहे. अभ्यासू महिलांचे सर्व बाबतीत योग्य नियोजन असते. आज जरी त्या पडद्यामागे काम करत असल्यात तरी, त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असते. कारण त्या साहेबांच्या सोबत कायम असतात. लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे, त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे हे त्या जाणून आहेत, असेही सत्तार म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular