सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघा मध्ये जोहान्सबर्ग मैदानात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात मूळचे खेड तालुक्यातील शिव गावचे सुपुत्र असलेले व सद्यस्थितीत दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या अल्लाउद्दीन पालेकर यांना कसोटी क्रिकेट पंच म्हणून काम करण्याचा मान मिळाला आहे. या निमित्ताने प्रत्येक कोकणवासियासाठी हि अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. अल्लाउद्दीन पालेकर हे लहानपणापासूनच दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास आहेत.
क्रिकेट खेळाची त्यांना लहानपणापासूनच विशेष आवड असून, त्यांचे वडीलही उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. याशिवाय त्यांनीही दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट पंच म्हणूनही काम पाहत आहेत. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत दक्षिण आफ्रिकेतच त्यांनी क्रिकेट क्षेत्रात आपले पाय रोवून, क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आहे. लहानपणापासून क्रिकेट खेळात त्यांनी अनेक विक्रम केले आहेत. अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाबद्दल पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
पालेकर या नावाची अनाउंसमेंट ऐकल्यावर, मराठी नाव म्हणून, महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा अंपायर आफ्रिकेकडून कसं पदार्पण केलं, तो महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील आहे या दक्षिण आफ्रिकेच्या पंचाबद्दल जाणून घेण्याची सर्वांची उत्सुकता वाढली आहे.
अल्लाउद्दीन पालेकर हे मुळचे कोकणातील रत्नागिरीचे. पालेकर कुटुंबिय हे मुळ रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील शीव गावचे रहिवाशी आहेत. अल्लाउद्दीनचे वडिल नोकरी निमित्ताने काही वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिकेत स्थलांतरित झाले. त्यानंतर अल्लाउद्दीनचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेत झाला.
शीव गावचे सरपंच दुर्वेश पालकर यांनी त्यांच्याबद्दल माहिती दिली, मी सुद्धा पालेकर आहे. अल्लाउद्दीन हे आमच्या गावातील आहेत. अल्लाउद्दीनचे वडिल नोकरीसाठी काही वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिकेला गेले असून, कायमचे तिथेच स्थायिक झाले. अल्लाउद्दीन आफ्रिकेतच जन्मला. मात्र त्याचं मूळ गाव शीव आहे.