29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeKhedसातबारावर नावाची नोंद करण्यासाठी लाच मागणारा मंडल अधिकारी ताब्यात

सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी लाच मागणारा मंडल अधिकारी ताब्यात

७/१२  वर नावाची नोंद घालून ती मंजूर करून देण्यासाठी सचिन गोवळकर याने तक्रारदार इसमाकडे १५ हजार रुपयाची मागणी केली होती.

जागा जमिनीचे व्यवहार, सरकारी काम जर असेल तर लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक सरकारी कामासाठी कर्मचाऱ्याचा खिसा गरम केल्याशिवाय काम पुढे जात नाही. ज्याप्रमाणे लाच घेणे हा गुन्हा आहे त्याचप्रमाणे लाच देणे हा पण गुन्हा आहे. त्यामुळे अनेक वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अशा गोष्टींसाठी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले असून सुद्धा आपले काम वेळेत व्हावे यासाठी लाच दिली जाते. पण यामुळे सर्व सामान्य जनतेला मात्र त्रास सहन करावा लागतो.

बुधवार दि. १२ रोजी खेड भरणे मंडल अधिकारी सचिन यशवंत गोवळकर याला सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी चौदा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भरणे ग्रामपंचायत कार्यालयातून मंडल अधिकारी गोवळकर याला अटक केली आहे.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२  वर नावाची नोंद घालून ती मंजूर करून देण्यासाठी सचिन गोवळकर याने तक्रारदार इसमाकडे १५ हजार रुपयाची मागणी केली होती. याबाबत संबंधित इसमाने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार, हा सापळा रचण्यात आला होता. ठाणे विभागाचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले व अपर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलिस उप-अधीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस हवालदार श्री नलावडे, .श्री.आंबेकर, श्री.पवार, पोलिस नाईक श्री. हुंबरे, श्री. चालक श्री. कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यामध्ये तो रंगेहाथ जाळ्यात सापडला आहे .

RELATED ARTICLES

Most Popular