28.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

वाशिष्ठी नदीत उडी मारणाऱ्या नवदाम्पत्याचा शोध सुरूच

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा गुरूवारी...

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...
HomeRatnagiriवीज बिले थकीत प्रकरणामध्ये, शासकीय कार्यालयांना महावितरणाचा “शॉक”

वीज बिले थकीत प्रकरणामध्ये, शासकीय कार्यालयांना महावितरणाचा “शॉक”

१५ दिवसाची आगावू नोटीस देऊन देखील बील न भरल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सर्कल आणि तलाठी कार्यालयाचे २२ हजार ३७० रुपये वीज बिल थकले आहे. याबाबत १५ दिवसाची आगावू नोटीस देऊन देखील बील न भरल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. एक प्रकारे शासकीय कार्यालयाला सुद्धा महावितरणाने शॉक दिला आहे.

महावितरण कंपनीने वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकांविरोधात जोरदार मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार नोटीस बजावूनही वीज बिल न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत वीज जोडणी तोडली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्कल आणि तलाठी कार्यालयाचेही वीजबील थकीत आहे. याबाबत महावितरण कंपनीने त्यांना नोटीस देऊन १५ दिवस आगावू सूचना दिली होती. तरीही वीज बिल न भरल्यामुळे अखेर महावितरणने सर्कल व तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

सामान्य ग्राहकांपासून ते सरकारी कार्यालयापर्यंत वीज बिले थकीत असल्याने महावितरण कंपनी अडचणीत आली आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा कंपनीला सोसावा लागत आहे. परंतु, आता महावितरण कंपनीने वीज बिल थकविणाऱ्या शासकीय कार्यालयांना महावितरण कंपनीने झटका द्यायला सुरुवात केली आहे.

या कारवाईमधून सरकारी कार्यालयांची सुद्धा सुटका झालेली नाही. महावितरणाने ठराविक कालावधीची आगाऊ सूचना देखील ज्या थकबाकीदारांनी बिल भरलेले नाही त्यांच्यावर सरसकट वीज तोडीची कारवाई करण्याचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे, महावितरणाच्या कारवाईच्या भीतीने काही प्रमाणात थकीत बिले भरण्यात येत आहेत. आणि महावितरणावरचा आर्थिक ताळमेळ थोड्या प्रमाणात का होईना जागेवर यायला मदत होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular