26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtra'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' नाना पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल

‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ नाना पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल

माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी,”  अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघामध्ये पक्षाचा पाया मजबूत राहण्यासाठी विविध ठिकाणी सभेचे आयोजन केले होते. रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे खळबळजनक वक्तव्य केले आहे आणि या संबंधित एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

नाना पटोलेंचा हा व्हिडीओ रात्रीच्या वेळचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे  लोकांच्या गराड्यात होतेत. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.’  नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत. सगळीकडे त्यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नाना पटोलेंच्या अशा निंदनीय वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या असभ्य वर्तणुकीबाबत नाना पटोलेंना अटक झाली पाहिजे अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा हि अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी,”  अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांवर नाना पटोले यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले की, “भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गावगुंड राहतो आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी असे वक्तव्य केलं आहे.” देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मी असे म्हणालेलो नाही.” परंतु या स्पष्टीकरणावर सुद्धा विरोधी पक्षांचे समाधान न झाल्याने त्यांनी त्याबाबतचा पुरावा सादर करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular