27.3 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

जिल्ह्यात सहा लाखांचा अवैध मद्य साठा जप्त…

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व...

प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण, बंदोबस्त तैनात

अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देत जड...

राजापूर प्रारूप प्रभाग रचनेवर ८३ हरकती

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे...
HomeKokanशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं अशी छुपी निती आमच्याच काही...

शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची – आम. योगेश कदम

केवळ एबी फॉर्म भरण्याच्या काही मिनिटं आधी त्यांच्या गळ्यात हे पट्टे घालण्यात आले. हे निर्णय शिवसैनिकांना मान्य नाहीत,

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका १८ जानेवारीला पार पडल्या. मंडणगड, दापोली, खेड व चिपळूण या तालुक्यातील पोट निवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी १८ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी सुट्टी जाहीर केलेली. दि. १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये प्राप्त झालेला असून सदर कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्हयात वरील तालुक्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूका घेण्यात आल्या.  ग्रामपंचायतींच्या निवडणूका जेथे नियोजित आहेत तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ठराविक भागामध्ये सुट्टी जाहीर केलेली होती. सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.

दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निवडून न येता अपक्ष उभे राहिलेले शिवसेनेचे आठ उमेदवार निवडून आले. निकालाच्या पाश्र्वभूमीवर आमदार  योगेश कदम यानी नाराजी जाहीर करत मनातील सल बोलून दाखवली आहे. शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं अशी छुपी राजनिती आमच्याच काही नेत्यांची होती असा गंभीर आरोप दापोली मंडणगडचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी केला आहे.

गेली पाच वर्ष दापोली नगरपंचायतीची शिवसेनेच्याच हाती सत्ता होती. ती आता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे गेली आहे. यामध्ये फायदा कोणाचा तर राष्ट्रवादीचा झाला आहे. शिवसेनेचा काहीही फायदा झालेला नाही. जे शिवसेनेच्या एबी फॉर्मवर निवडून आले आहेत त्यापैकी सहापैकी चार जण हे राष्ट्रवादी पक्षचे लोक आहेत. त्यांना शिवसैनिक म्हणता येणार नाही. म्हणजे केवळ एबी फॉर्म भरण्याच्या काही मिनिटं आधी त्यांच्या गळ्यात हे पट्टे घालण्यात आले. हे निर्णय शिवसैनिकांना मान्य नाहीत,  असं आमदार योगेश कदम यांनी सांगितलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular