26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraभाजपच्या नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल

भाजपच्या नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल

काही लोकांचा फायदा असल्याने आघाडी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा थेट आरोप सोमय्यांनी केला आहे.

सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी दिलेल्या परवानगीमुळे, अनेक पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. या विषयाला उलटसुलट वळण लागले असून, नक्की हा निर्णय कोणासाठी घेतला गेला आहे यावर चर्चा सुरू आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांकडून देखील गंभीर आरोप करण्यात आले. संजय राऊत यांनी मागच्या काळात काही वाईनरी चालकांशी पार्टनरशीप केल्याचा आरोप करत, काही लोकांचा फायदा असल्याने आघाडी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा थेट आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना जोरदार टीका केली आहे.

राऊत त्यावर प्रत्युत्तरादाखल म्हणाले आहेत कि, एखाद्या कुटुंबातील व्यक्ती एखादा व्यवसाय करत असेल तर तो गुन्हा आहे का? राऊत कुटुंबियांनी वाईन उद्योजकांसोबत करार केल्याचा दावा सोमय्या यांनी केला. याबाबतची काही कागदपत्रेही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. त्यावर संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं. सोमय्यांनी जी जी नावे सांगितली ते सर्व वाईनरी कंपनीत संचालक आहेत. आता संचालक असणं गुन्हा आहे का?

भाजपच्या नेत्यांची मुलं केळी विकतात का? किरीट सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे विकतो का? अमित शहांचा मुलगा केळी विकतो की ढोकळा विकतो?  देवेंद्र फडणवीस यांची मुलं रोडवर स्टॉल टाकणार की डान्सबार टाकणार अशी तिखट शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. भाजप नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले की, भाजपच्या लोकांनी जे आरोप केलेत, ते जर खरे असतील तर त्या त्यांच्या नावावर करायला तयार आहोत असंही ते म्हणाले.

आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतला कि, भाजपच्या लोकांचे अशा प्रकारचे घाणेरडं राजकारण सुरू झाले. तुम्ही आमच्या कुटुंबापर्यंत आलेत, मात्र तुमच्या सारखी आमची मुलं ड्रग्ज विकत नाहीत. भाजपच्या किती लोकांच्या वाईनरी आहेत ते पाहा. तसंच वाईन विक्रीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular