26.7 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeLifestyleविरुष्काने गुंतवणूक केलेले “प्लांट बेस्ड मीट“ नक्की काय आहे !

विरुष्काने गुंतवणूक केलेले “प्लांट बेस्ड मीट“ नक्की काय आहे !

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी मुंबईस्थित स्टार्टअप ब्ल्यू ट्राईबमध्ये गुंतवणूक केली आहे.

जगात मांसाहाराला शाकाहारी पर्याय देणाऱ्या कंपन्यांचा व्यवसायही झपाट्यानं वाढला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी मुंबईस्थित स्टार्टअप ब्ल्यू ट्राईबमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी वनस्पती आधारित मांस तयार करते. आपण मांस नाही, तर वनस्पतीच्या विविधतेपासून बनवलेल्या वस्तूचे सेवन करू. हे केवळ प्राण्यांच्या प्रेमापोटी नाही, तर पर्यावरणासाठीही गरजेचे असल्याचे दोघांनी म्हटलं आहे.

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे  की, हे वनस्पती आधारित मांस म्हणजे नक्की काय भानगड आहे! तर त्याबद्दल जाणून घेऊया, काय असते प्लांट बेस्ड मीट? आरोग्यासाठी ते किती उपयुक्त आहे आणि त्याची चव खरोखरच मांसासारखी लागते का? किती प्रमाणात त्याचे सेवन केले पाहिजे?

मिळालेल्या माहितीनुसार, प्लांट बेस्ड मीट हे वनस्पतींमधून काढलेल्या अनेक गोष्टींपासून तयार केले जाते. हे प्रोटीन, ग्‍लूटेन, मसाले, सोया,  नारळाचे तेल, बीटाचा रस आणि तांदळापासून बनवले जाते. प्लांट बेस्ड मीट  हे एकदम मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवले जात नाही तर ते आवश्यकतेनुसारच्या प्रमाणात तयार केले जाते आणि मागणीनुसारच बनवून त्याचा पुरवठा केला जातो.

तर प्लांट बेस्ड मीट  एखाद्या प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसापेक्षा वेगळे असते. म्हणजेच, ‘प्लांट बेस्ड मीट’ हे वनस्पतींमधून घेतलेल्या गोष्टीपासून तयार केले जाते. तर प्रयोगशाळेतील मांस हे प्राण्यांच्या पेशींपासून बनवले जाते. हे मांस तयार करताना त्या प्रकारचा रंग, चव आणि प्रथिने यांची विशेष काळजी घेऊन बनविले जाते. प्लांट बेस्ड मीट ची चव देखील प्राण्यांच्या मांसासारखी लागते. ज्या लोकांनी प्राण्यावरील हिंसा बंद व्हावी आणि त्यांच्या प्रेमापोटी मांसाहर करणं बंद केले आहे. ते याचे सेवन करू शकतात आणि मांस खाल्ल्याचा आनंद मिळवू शकतात, पण, ठराविक प्रमाणातच त्याचे सेवन करावे.

RELATED ARTICLES

Most Popular