29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...

वाढत्या समस्यांनी रत्नागिरीकर त्रस्त, शहराच्या दुरवस्थेबाबत भाजप आक्रमक

शहरातील खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, गटारांची खराब...
HomeRatnagiriरत्नागिरीकर रॉक्स

रत्नागिरीकर रॉक्स

सगळ जग फक्त कोरोनामय झाले असून, ज्याच्या त्याच्या डोक्यात फक्त आजूबाजूला पसरणारा संसर्ग, कोरोनावरील उपाय, कोणती लस चांगली, कोणाला लसीचा कसा अनुभव आला, कोणाच्या कुटुंबातील कोणाचा तरी झालेला मृत्यू त्यामुळे वाटणारी हळहळ या सर्वामध्येच मागील एक वर्ष गेले असेल. परंतु, आता कोरोनाचा प्रभाव थोडा ओसरला असून, प्रत्येक जण कुठून तरी आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहे. मग त्यामध्ये रत्नागिरीकर कसे काय मागे राहतील!!!

रत्नागिरीतील स्थानिक उस्फूर्त कलाकार मंडळीनी एकत्रित येऊन अर्थात (कोरोना निर्बंध पाळूनच) न्यू एरा प्रोडक्शन आणि मराठी रंगभूमी रत्नागिरीच्या संयुक्त विद्यमाने नवी सुरुवात नावाची एक शॉर्ट फिल्म नुकतीच यु-ट्यूब वर सुरु केली आहे. याचे कथानक काहीसे कोरोनावर महामारीवर आधारित आहे. कोरोनाच्या कठीण काळामध्ये मानवाची अगदी जवळच्या ते लांबच्या सर्वांचीच विविध रूपे समोर आली आहेत. अर्थात कोरोनामुळे हतबल झालेला माणूस ओढवलेल्या परिस्थितीमध्ये काय करू शकतो याचे सुरेख चित्रीकरण या फिल्ममध्ये दाखविण्यात आले आहे. कोरोनामुळे काही नाती काही माणसे दुरावली गेलीत, काही ठिकाणी तर कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे माणुसकीसुद्धा मृत झालेली दिसून आली आहे, तर काही ठिकाणी जात धर्म कसलेही बंधन न झुगारता माणुसकीचे दर्शन झालेले पाहायला मिळाले आहे.

नवी सुरुवात या शॉर्ट फिल्मच्या नावावरूनच मनाला काहीसा दिलासा मिळतो. कोरोनामुळे हरलेल्या जीवाला कुठेतरी पुन्हा उभं राहून आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळामध्ये विविध लोकांचे आलेले विविध अनुभव आपण अनुभवले. या शॉर्ट फिल्ममध्ये कोरोनाम्ध्ये सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा स्वताच्या मनाने तयार झालेली आपुकीची भावना कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी केला गेलेला प्रयत्न दाखवण्यात आला आहे.

या शॉर्ट फिल्मचे लेखन स्थानिक कलाकार स्वानंद मयेकर, प्रशांत पवार, यांनी केले असून, पार्श्वसंगीत निखील भुते, कला दिग्दर्शन प्रवीण धूमक, छायांकन प्रसाद राणे आणि दिग्दर्शन ओमकार पाटील यांनी केले आहे. ही शॉर्ट फिल्म ७ मिनिटांची असून यामध्ये स्वानंद मयेकर, स्मितल चव्हाण, अजित पाटील, सागर मायंगडे, सिद्धी लांजेकर तसेच बाल कलाकार म्हणून आर्या आणि आयुष यांनी अभिनय केलेला आहे.

पूर्वीचा लेख
पुढील लेख
RELATED ARTICLES

Most Popular