24.8 C
Ratnagiri
Monday, November 24, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRajapurधोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, मेळाव्यात सर्वानुमते निर्धार

धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, मेळाव्यात सर्वानुमते निर्धार

राजापूर तालुक्यात रिफायनरी समर्थनार्थ सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले. तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असतानाच आता रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रिफायनरी समन्वय समितीने रविवार ६ मार्च रोजी सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळाव्याचे आयोजन केले होते. भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि शिवसेनेचे कार्यकते मेळाव्याला उपस्थिती लावली होती.

रिफायनरी प्रकल्पाबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका दर्शवल्याने राजापूर धोपेश्वर येथील यशोदिन गार्डन हॉल येथे दुपारी ३ वाजता हा मेळावा घेण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती राजापूरच्या वतीने आयोजित केलेल्या समर्थन मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, तालुक्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रविवारी राजापूरात मेळावा आयोजित करण्यात आला होता.

धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे असा सर्वानुमते निर्धार या मेळाव्यात करण्यात आला आहे. तसा सर्व पक्षीय एकमुखी ठराव पारीत करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्ते या समर्थन मेळाव्यात दिसले. धोपेश्वर बारसू गोवळ परिसरातील स्थानिक जनतेबरोबरच राजापूर तालुक्याच्या पुर्व भागापासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या सर्व गावांतील रिफायनरी समर्थकांनी उत्स्फुर्तपणे या मेळाव्याला हजेरी लावली होती.

काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. सेना खासदार विनायक राउत यांनी सुद्धा जिथे विरोध होणार नाही अशा जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने गावावर आणि ग्रामस्थांवर हा प्रकल्प लादला जाणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular