राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला असल्याची माहिती दिली आहे. चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद देखील आहे. त्याचवेळी त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. अखेर चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीकडून लवकरच नव्या महिला अध्यक्षाची घोषणा होईल, अशी माहिती मिळत आहे.
रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आलं होतं. परंतु त्यांनी आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे साऱ्याचे लक्ष लागलं आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हातामोकळी केली आहेत. त्यामुळे त्यांचे दमदार काम पाहता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांनीही राजकारणात प्रवेश केला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास घडला आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. रस्त्यावर करण्यात येणारी आंदोलनं ते भव्य व्यासपीठ, हजारोंच्या गर्दीमध्ये रुपाली चाकणकर यांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले. अतिशय स्पष्टवक्ता, विषयाचे उपयुक्त ज्ञान, मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, विरोधकांना पळता भुई थोडी करणे यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.