27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraजिल्ह्यांना समुद्र किनाऱ्याची स्वच्छतेसाठी मिळणार 'बीच क्लिनिंग मशीन'

जिल्ह्यांना समुद्र किनाऱ्याची स्वच्छतेसाठी मिळणार ‘बीच क्लिनिंग मशीन’

'बीच क्लिनिंग मशीन' नावाचे हे यंत्र जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या काही दिवसांमध्येच हस्तांतरित करण्यात येणार आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित जिल्हाधिकारी यांना कळवले आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ स्वयंचलित यंत्र देणार आहे. हे यंत्र काही दिवसांतच संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केले जाणार असून, त्या यंत्राचा एका वर्षांचा स्वच्छते करिता खर्च राज्य प्रदूषण नियंत्रण विभाग उचलणार आहे. हे यंत्र पहिल्या वर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या ठेकेदारामार्फत चालवण्यात येणार असून देखभाल दुरुस्तीची दोन वर्षे हमी असणार आहे. हे यंत्र या कालावधीत कार्यरत ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोपवण्यात आली आहे.

राज्यात असणारे अनेक समुद्र किनारे हे मोठे असल्याने पर्यटकांचा ओघ तिथे जास्त असतो. सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या मंडळाच्या बैठकीत किनाऱ्यांची स्वच्छता राखणे व पर्यावरणीय संवर्धनासह पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने या स्वयंचलित समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करणाऱ्या प्रत्येकी सुमारे ८० लाख रुपयांच्या यंत्रसामुग्री खरेदीला मंजुरी दिली होती. ‘बीच क्लिनिंग मशीन’ नावाचे हे यंत्र जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या काही दिवसांमध्येच हस्तांतरित करण्यात येणार आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित जिल्हाधिकारी यांना कळवले आहे. या यंत्रांची वितरणासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे.

स्वयंचलित किनारा स्वच्छता यंत्राला सॅण्ड क्लीनर, रॉक बकेट, ग्रॅब्लर बकेट अशा वेगवेगळय़ा संबंधित सोबत देण्यात येणार असून या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहून सोबत देण्यात येणारे विविध संलग्नक निविदेप्रमाणे योग्य असल्यासच यंत्र स्वीकारण्यात यावे असे स्पष्ट कळविण्यात आले आहे. या स्वयंचलित यंत्रामुळे किनाऱ्यावर होणारी अस्वच्छता कमी कालावधीत दूर होण्यास मदत होणार आहे, आणि जलद गतीने सफाई होणार असल्याने मनुष्यबळ कमी लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular