25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunसुनेच्या खूनप्रकरणी सासूला आजन्म कारावासाची शिक्षा

सुनेच्या खूनप्रकरणी सासूला आजन्म कारावासाची शिक्षा

आईला आपली आजी मारहाण करत असल्याचे पाहून ही माहिती तीन वर्षीय मुलाने शेजाऱ्यांना सांगितली.

चिपळूण  तालुक्यातील वालोपे देऊळवाडी येथे ही घटना २९ एप्रिल २०१७ मध्ये घडली होती.  सुनेवर छाती आणि पोटात सुरीने वार करून  नंतर तिला भोसकून ठार मारल्याप्रकरणी तिची आरोपी सासू रेणुका नामदेव करकाळे वय ५५ हिला शिक्षा ठोठावली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सासूने केलेल्या आघाताने परी प्रशांत करकाळे वय २५ या विवाहितेचा मृत्यू ओढवला  होता. हे सर्व घडत असताना परीच्या लहानग्याने शेजारी जाऊन आजी आईला मारत आहे असे सांगितले. त्यामुळे हि घटना समोर आली.

परी यांचा २०१२ साली प्रशांत करकाळे सोबत विवाह झाला. विवाह झाल्यानंतर घरात कौटुंबिक वाद सुरू झाले. सासू-सुनेमध्ये तर सततचे वाद होत असत. परी करकाळे यांना २०१७ मध्ये दोन मुले होती. घरातील सासू व सुनेतील वाद थांबविण्यासाठी वारंवार बैठका झाल्या तरी, काही वाद थांबत नव्हते.

२९ एप्रिल २०१७ ला रेणुका नामदेव करकाळे आणि परी प्रशांत करकाळे यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला कि, सकाळी साडे नऊच्या सुमारास रेणुका करकाळे हिने सुरीने सून परी हिच्यावर सपासप वार केले. छातीत तसेच पोटात तब्बल ३६ वार करत तिला भोसकून ठार मारून टाकले. आईला आपली आजी मारहाण करत असल्याचे पाहून ही माहिती तीन वर्षीय मुलाने शेजाऱ्यांना सांगितली. शेजारी घरी आले तेव्हा परी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

या घटनेची माहिती वालोपेचे पोलिस पाटील बाळकृष्ण भिकू कदम यांनी दिली होती. त्यानुसार रेणुका नामदेव करकाळे हिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल विनायक मधुकर चव्हाण, वेदा संतोष मोरे यांनी वेगाने तपास केला होता. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी या गुन्ह्याचा निकाल लागला आहे. या घटनेत एकूण १५ सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये स्मिता मयेकर आणि अजय कदम हे प्रमुख साक्षीदार होते, त्यांची साक्ष खूप महत्त्वाची ठरली आहे. सरकारी वकील म्हणून पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी रेणुका करकाळे हिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. या सोबतच १० हजारांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular