27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriसीएनजी गॅससाठी, कंपनीकडून ३०० रुपयांच्या ऑईलची सक्ती

सीएनजी गॅससाठी, कंपनीकडून ३०० रुपयांच्या ऑईलची सक्ती

रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शिमग्याच्या आधीपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळीकडे सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सीएनजीचे पंप सुद्धा ठराविक असल्याने मोठ्या प्रमाणात पंपाच्या बाहेर रांग लावावी लागत आहे. रिक्षा व्यावसायिक त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. दिवसातील अर्धा वेळ रांगेतच उभे राहिल्याने व्यवसाय करायचा तरी कसा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. त्यात आता पंप चालकांचे नवीनच नाटक समोर आल्याचे समजत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच सीएनजी गॅस हवा असल्यास तीनशे रुपये किमतीचे ऑईल घावे लागत आहे. याबाबत पंपाच्या मालकांना विचारणा केली असता, एचपी कंपनीकडूनच ऑईल विकण्यासाठी  सांगितले आहे. ऑईल स्टॉक उचलल्याशिवाय त्यांना कंपनीकडून पेट्रोल-डिझेेल मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

सीएनजी घेण्यासाठी ऑईल कंपनीकडून ऑईलची सक्ती केली जात आहे. त्यामुळे सीएनजी पंप चालकांच्या मनमानी कारभारामुळे रिक्षा व्यावसायिक आणि मोटारचालकांना मनस्ताप सहन करायला लागत आहे. याबाबतची माहिती समजताच देवरूख येथील मनसे आणि भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंपावर धाव घेत माहिती घेतली आणि संगमेश्‍वर तहसीलदारांना सोमवारी निवेदन दिले.

ऑईल सक्तीमुळे पेट्रोल पंपचालक आणि रिक्षा चालक, खासगी वाहन धारक यांच्यात वाद निर्माण होत आहेत. यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे मनसे आणि भाजपच्या पदाधिकारी, दोन्ही रिक्षा संघटनाचे कार्यकर्ते यांनी सांगितले. ही मनमानी बंद न झाल्यास रिक्षाचालकांना घेऊन उग्र आंदोलन करू असा सज्जड इशाराच देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular