22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeDapoliदापोलीतील लेखकाच्या लघुनिबंधाचा सी.बी.एस.ई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समावेश

दापोलीतील लेखकाच्या लघुनिबंधाचा सी.बी.एस.ई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समावेश

अनेक वर्षे निलेश याची इच्छा होती की आपली एखादी कविता किंवा लघुनिबंध महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावी.

दापोली तालुक्यातील पिसई काटकरवाडी या ग्रामीण भागात राहून निलेश सारख्या युवकाने घेतलेली हि गरुड भरारी नक्कीच प्रेरणादायी आहे. निलेश याला इयत्ता चौथीपासूनच लिखाणाची विशेष आवड आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई संगीता आणि गावातील ग्रामस्थ यांनी निलेशचे मनोबल वाढवले.

दापोली तालुक्यातील पीसई येथील ३३ वर्षीय लेखक निलेश उजाळ याच्या लघुनिबंधाचा समावेश दिल्ली सी.बी.एस.ई बोर्डाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. इयत्ता सातवीच्या मराठी भाषेच्या पुस्तकामध्ये सुसंगती सदा घडो असे शीर्षक असलेला हा पाठ आहे. निलेशच्या या यशामुळे दापोली तालुक्याची शान वाढली आहे.

निलेश यांचे शिक्षण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत झाले. अनेक वर्षे निलेश याची इच्छा होती की आपली एखादी कविता किंवा लघुनिबंध महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावी. पण यात त्याला यश मिळाले नव्हते. किंबहुना यात आपले प्रयत्न अद्याप कुठेतरी कमीच पडत आहेत, असे निलेश याला सातत्याने वाटत होते. मात्र अचानक दिल्ली बोर्डाच्या अभ्यासक्रमात ‘सुसंगती सदा घडो’ हा धडयाचा समावेश करण्यात आल्याचे कळविण्यात आल्यानंतर, महाराष्ट्र बोर्डाची उणीव दिल्ली बोर्डाने भरून काढली,  अशी भावना निलेश उजाळ याने व्यक्त केली.

निलेश उजाळ यांनी ‘नकळत सारे घडले’ आणि ‘ललित २०५’ या मालिकांसाठी शीर्षक गीत लिहिले आहे. ‘सोन्याची पावलं’ यासाठी शीर्षक गीत लिहिले आहे. हळदीच गाणं देखील लिहिले आहे.  सुरंगी फुले हा बालकविता संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे लेखनाच्या कार्यामध्ये त्यांचे सुरु असलेले काम नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular