30.8 C
Ratnagiri
Wednesday, January 15, 2025

श्रीदेव मार्लेश्वर-गिरीजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ...

शिक्षकाच्या वासनाकांडाने रत्नागिरी हादरली आणखी एका शिक्षकाचे ‘प्रताप’ चव्हाट्यावर

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासत विद्यार्थीनींशी नको ती...

पदाला चिकटलेल्यांना बाजूला करा, चिपळुणात ठाकरे शिवसैनिकांची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात संघटना वाढवायची असेल, तर प्रथम...
HomeMaharashtraसिल्वरओक हल्ला प्रकरणी, ॲड.सदावर्ते यांना अटक

सिल्वरओक हल्ला प्रकरणी, ॲड.सदावर्ते यांना अटक

एलजी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे.

शरद पवारांच्‍या निवासस्‍थानावरील हल्‍लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना किला न्‍यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह अटक केलेल्या १०९ संशयित आरोपींना आज किल्ला कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील, सदावर्ते यांचे वकील आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अशी तिन्ही बाजूंनी किला कोर्टात युक्तिवाद झाला. तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्‍यायाधीशांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर एलजी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस ठाण्यात नेत असताना जबरदस्ती केली जाते का? असा प्रश्न विचारले असता, होय केली जातीय असं त्यांनी सांगितले. कोर्टाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, माझी हत्या देखील होऊ शकते, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात हजर होण्यापूर्वी दिली होती. पण लवकरच दूध का दूध पानी का पानी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लवकरच सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या सर्व प्रकरणाबद्दल दिलीप वळसे पाटील म्हणाले, काल घडलेल्या घटनेनंतर आज न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे, त्याचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे. आता या प्रकरणामध्ये सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. कायदा सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी एसटी कर्मचाऱ्यांनी घ्यायची आहे. सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेले सगळे आरोप मी फेटाळून लावत आहे. त्यांना अशा प्रकारचे आरोप करण्याची सवयच आहे. दुसरीकडे १०९ एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular