रणबीर आणि आलिया ४ वर्षांहून अधिक काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले बाँडिंग शेअर करतात. रणबीरची आई नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी आलियाला खूप आवडतात आणि अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टवर ती त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसते.
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या तारखेची चर्चा अनेक दिवस सुरु आहे. अखेर ती तारीख ठरली आहे. मिळालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार, १३ एप्रिलपासून या कपलचा विवाहसोहळा सुरू होणार आहे. चेंबूरच्या ‘आरके हाऊस’मध्ये लग्नाआधीच्या विधी आणि भव्य विवाहसोहळा पार पडला आहे. ३-४ दिवसांच्या विधी आणि सोहळ्यानंतर १४ एप्रिलला रणबीर-आलिया पंजाबी पारंपारिक रिती रिवाजानुसार लग्न पार पडले आहे.
आरके हाऊसमध्ये दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. १३ एप्रिल रोजी या आलियाच्या हातावर मेहंदी लावली गेली. यानंतर हळद, संगीतासह सर्व सोहळे संपन्न झाले. रणबीरचे आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा विवाह देखील आरके हाऊसमध्येच संपन्न झाला होता.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पंजाबी पद्धतीनुसार दोघे विवाहबद्ध झाले आहेत. आलिया भट्ट आता मिसेस आलिया रणबीर कपूर झाली आहे. लग्नानंतर आलियाने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. यात नववधू आलिया आणि वर रणबीरचा संपूर्ण अंदाज लक्षवेधक आहे. त्यांच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “ज्या बाल्कनीत आम्ही आमच्या रिलेशनशिपची पाच वर्षे घालवली, त्याच ठिकाणी आज आम्ही विवाहबद्ध झालो आहोत.
लग्नात दोघांचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि काही सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आता सोशल मीडियावर ‘#Mr & Mrs Kapoor’ ट्रेंड मध्ये आहे. अहवालानुसार, एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला ९०-११० कोटी रुपयांना हक्क विकले गेले आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यातच रणबीर आणि आलियाचे लग्न ओटीटीवर प्रसारित होणार आहे. वास्तू अपार्टमेंटमध्ये लग्नासाठी पोहोचलेल्या पाहुण्यांसह कर्माचारा-यांच्या मोबाइल कॅमे-यावर गुलाबी रंगाची टेप लावण्यात येत आहे. जेणेकरून समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर कुठेही लीक होऊ नयेत यासाठी हि काळजी घेण्यात आली होती.