26.1 C
Ratnagiri
Thursday, March 13, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeMaharashtraराज्यात भविष्यात विनाभारनियमन स्थिती कायम ठेवण्यासाठी, उत्तम नियोजन करणे गरजेचे

राज्यात भविष्यात विनाभारनियमन स्थिती कायम ठेवण्यासाठी, उत्तम नियोजन करणे गरजेचे

पाच दिवसांपासून राज्यातील भारनियमन बंद करण्यात ऊर्जा विभागाला यश मिळाले आहे.

राज्यातील विजेची मागणी आणि पुरवठय़ातील अडीच हजार मेगावॉटची तफावत भरून काढत गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील भारनियमन बंद करण्यात ऊर्जा विभागाला यश मिळाले आहे. मात्र, कोळसा टंचाईमुळे राज्यावरील वीजसंकट कायम असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सुमारे आठ हजार मेगावॉट वाढीव विजेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश ऊर्जा विभागाला दिल़े

कोळसा टंचाई आणि वाढत्या वीज मागणीमुळे राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. राज्यातील विजेची दररोजची विजेची तफावत, सरकारने खुल्या बाजारातून वीज खरेदीस परवानगी दिल्यानंतर ऊर्जा विभागाने विविध उपाय योजनांच्या माध्यमातून ही तूट भरून काढल्याने गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील भारनियमन बंद करण्यात आले. मात्र, विजेच्या मागणीत दररोज वाढ होत असून, त्या तुलनेत कोळसा उपलब्ध होत नसल्याने सरकारची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात विना भारनियमन परिस्थिती भविष्यातही कायम ठेवण्यासाठी वीज निर्मिती,  कोळसा साठा, आयात कोळसा, वीज खरेदी याचे उत्तम नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीच्या आणि दिर्घकालीन उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याची सध्याची वीजनिर्मिती, कोळशाचा साठा, विजेची सध्याची आणि भविष्यातील मागणी आणि याअनुषंगाने उपाय योजनांचा मंगळवारी आढावा घेतला. बैठकीस उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक विजय सिंघल, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular