28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

घरकुल लाभार्थ्यांच्या पदरात वाळूचा अद्याप कणही नाही…

राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात वाळू धोरणात...

महानिर्मितीच्या कामगारांच्या वेतनात गोंधळ, ८ ठेकेदारांना बजावली नोटीस

पोफळी येथील महानिर्मिती विभागात टेकेदापी पद्धतीने कार्यरत...
HomeMaharashtraझोपलेल्या महिलेच्या कुशीतून तिच्या बाळाची चोरी, अपहरणाचा गुन्हा दाखल

झोपलेल्या महिलेच्या कुशीतून तिच्या बाळाची चोरी, अपहरणाचा गुन्हा दाखल

युवराज वसंत कोळी या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि ३६३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यात चोरीच्या प्रकरणांनी डोके वर काढत असताना, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी.बस स्थानकात झोपलेल्या महिलेच्या कुशीतून तिच्या बाळाची चोरी केल्याने पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयातून नवजात बालकांचे अपहरण या घटना घडत असतात. परंतु, पोलादपूर येथील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे लहान मुलांचे अपहरण करून त्याचा वापर अनेक बेकायदेशीर गोष्टींसाठी देखील केला जातो. अथवा काही वेळा त्यांची विक्री देखील केली जाते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पोलादपूर एस.टी.बस स्थानकामध्ये सडवली आदिवासी वाडीतील सुमन वसंत कोळी वय ३० ही भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणारी महिला युवराज वसंत कोळी या आठ महिने वयाच्या बाळासह झोपली होती. यावेळी अज्ञात इसमाने तिचे बाळ पळविल्याची घटना रविवारी रात्री बारा वाजण्यापूर्वी घडली आहे. अचानक घडलेल्या या अपहरणाच्या घटनेने त्या महिलेने धसका घेतला असून तिची परिस्थिती नाजूक बनली आहे. सर्वत्र शोध घेऊन देखील अजूनही बालकाचा शोध लागलेला नाही.

 या घटनेची फिर्याद आई सुमन कोळी हिने सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी अंगात हिरव्या रंगाचा टी-शर्ट, कमरेला सप्तरंगी दोरा आणि उंची दीड फूट, वर्ण गोरा अशा वर्णनाचा युवराज वसंत कोळी या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि ३६३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलादपूर पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप शिरगांवकर हे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular