23.1 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeKokanपालशेत शाळा नं. १ चे विद्यार्थी भाग्य दिले तू मला मराठी मालिकेत...

पालशेत शाळा नं. १ चे विद्यार्थी भाग्य दिले तू मला मराठी मालिकेत झळकले

या मालिकेचे दोन टप्प्यातील चित्रिकरण पालशेत नं. १ प्रशाला व पालशेत परिसरात झाले. शाळेतील मुलांनाही मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत शाळा नं. १ चे विद्यार्थी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत झळकत आहेत. या मालिकेचे दोन टप्प्यातील चित्रिकरण पालशेत नं. १ प्रशाला व पालशेत परिसरात झाले. शाळेतील मुलांनाही मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली.

शाळेतील चित्रिकरणामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश होता. मालिकेची नायिका एका वर्गावर विज्ञान विषय शिकविताना दाखविण्यात आले आहे. ओवी चव्हाण, श्रावणी हेदवकर, स्वराजराजे राशिनकर, सेजल साळुंके व अन्य सहभागी होण्याची संधी मिळाली तसेच टीव्हीवर दिसणार्‍या मालिकांचे चित्रिकरण कसे होते हे जवळून अनुभवता आले.

या मालिकेचे चित्रिकरण पालशेत नं १ मध्ये करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच या निमित्ताने प्रशालेत अनेक मान्यवर मंडळी आल्याबद्दल मुख्याध्यापिका दर्शना समगिस्कर, उपशिक्षक संतोष गावडे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी अभिनेत्री निवेदिता सराफ, व अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले, जेष्ठ दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, दिग्दर्शक सागर खेऊर कलर्स मराठी वाहिनीचे कार्यकारी निर्माता मयुरेश वाघे, बालकलाकार पृथा सैदाणें, आर्चिस तवसाळकर, रोमांच देवळेकर व अन्य कलाकार टीमचे स्वागत केले. आभार मानले.

कश्मिरा पठारे यांच्या विराट इंटरटेनमेंट तर्फे निर्मित “भाग्य दिले तू मला” ही मराठी मालिका आहे. कलर्स मराठी या मराठी वाहिनीवर या मालिकेचे प्रक्षेपण ४ एप्रिल पासून सुरू झाले आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेमध्ये रत्नमाला नावाची विशेष व्यक्तिरेखा साकारत असून, त्यांच्यासोबत अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेदार  प्रमुख भूमिकेमध्ये काम करत आहेत.

या मालिकेचे चित्रिकरण पालशेत नं १ प्रशाला व पालशेत परिसरात झाले. या निमित्ताने पालशेत नं. १ मधील विद्यार्थ्यांना टि.व्ही. वर दिसणाऱ्या मालिकांचे चित्रिकरण कसे होते हे जवळून अनुभवता आले.तसेच विद्यार्थ्यांना चित्रिकरणामध्ये थेट काम करण्याची संधी मिळाली ही मालिका सध्या टि.व्ही. वर दिसत असल्याने पालशेत शाळेतील मुलांना टि.व्ही. वर पाहण्याची संधी पालकांना मिळाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular