28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeChiplunअलोरे येथील पोहायला गेलेल्या चार जणांपैकी, दोन पाण्यात बेपत्ता

अलोरे येथील पोहायला गेलेल्या चार जणांपैकी, दोन पाण्यात बेपत्ता

पाण्यात अडकल्यावर आणि बाहेर पडण्याचा काहीच मार्ग समोर न दिसल्यामुळे चौघांनी मोठ्याने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली.

जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून, ग्रामीण भागामध्ये अनेक जण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आणि उष्णतेपासून सुटका मिळण्यासाठी नदी, खाडी, कालवा किंवा समुद्रामध्ये जातात. पण अनेकांना पाण्याचा अंदाज नसल्याने काही विपरित घटना घडतात. काल अशीच एक घटना चिपळूण मध्ये घडली.

चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील चार जण कोळकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले असता कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडत होते. त्यातील दोघांना तेथील ग्रामस्थ बांधवांनी वाचवले. मात्र दोघे अद्याप बेपत्ता आहेत. अलोरे सोमेश्वर मंदिर नजीक राहणारा सुजय संजय गावडे व  ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर यांचा समावेश आहे. ही घटना सायंकाळी घडली

याबाबत उपलब्ध माहितीनुसार बुधवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान दरम्यान सुजय गावठे , ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर सोबत शाहीन कुट्टीनो , रुद्र जंगम कोळकेवाडी टप्पा चार नजीक कालव्यात पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते आणखीनच पाण्यात अडकत गेले.

पाण्यात अडकल्यावर आणि बाहेर पडण्याचा काहीच मार्ग समोर न दिसल्यामुळे चौघांनी मोठ्याने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथेच काम करणाऱ्या ग्रामस्थांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता रुद्र आणि शाहीन याना बाहेर काढले. यावेळी सुजय देखील बाहेर येत होता. मात्र ऐश्वर्या बुडत असल्याचे बघून तो तिला वाचवण्यासाठी पुन्हा पाण्यात गेला. आणि त्यानंतर मात्र दोघेही बेपत्ता झाले, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेणे सुरू होते.

RELATED ARTICLES

Most Popular