24.6 C
Ratnagiri
Thursday, December 26, 2024
HomeIndiaकोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

मालवाहतुकीसाठी रेल्वे मार्ग मोकळा ठेवण्यासाठी रेल्वेने ६७० प्रवासी वाहतूक गाड्याच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.

देशात सध्या विजेचे मोठे संकट ओढवले आहे. वाढत्या उष्म्यामुळे विजेची मागणी देखील मोठ्या प्रमाणात  वाढली असल्याने, या मागणीची पुर्तता करण्यासाठी वीजगृहांतील भट्ट्या सतत धगधगत आहेत. एप्रिलमध्ये विजेची मागणी अचानक वाढल्याने विज निर्मिती प्रकल्पांत कोळशाची टंचाई निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

इतर कोळसा उत्पादक राज्यांमधून कोळश्याची मागणी पूर्ण करण्यासाठी, झारखंड, छत्तीसगड आणि रेल्वे गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यातील वीज निर्मिती प्रकल्पांपर्यंत कोळशाची वाहतूक सुरु आहे. कोळशाची  वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा क्षेत्र तसेच रेल्वे यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे मालवाहतुकीसाठी रेल्वे मार्ग मोकळा ठेवण्यासाठी रेल्वेने ६७० प्रवासी वाहतूक गाड्याच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.

कोळशाने भरलेल्या मालगाड्यांना मार्ग खुला करण्यासाठी रेल्वेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या रद्द करायला सुरुवात केली आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे पर्यंत ६७० पॅसेंजर रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी ५०० हून अधिक गाड्यामध्ये लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्याचा समावेश आहे.

रेल्वेने कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांच्या संख्येत वाढ केली आहे. सध्या दररोज ४०० हून अधिक कोळसा वाहतूक करणाऱ्या गाड्या धावत आहेत. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या गणली जात  आहे. यामधून सरासरी ३ हजार ५०० ते ३ हजार ७०० मेट्रिक टन कोळसा वाहून नेला जातो. राज्यावरील विजेच्या टंचाईचे उद्भवलेले संकट दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular