23.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeIndiaतरुणीने चालत्या ट्रेनमध्ये जीवन संपविले

तरुणीने चालत्या ट्रेनमध्ये जीवन संपविले

भरधाव वेगामध्ये असणाऱ्या रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

चालत्या रेल्वेमधून आत्महत्या करणे, उडी मारणे या प्रकारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. तरुणाई हल्ली शुल्लक कारणावरून आत्महत्येसारख टोकच पाउल उचलताना दिसतात. मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरा पर्यंत जाणाऱ्या स्वराज एक्स्प्रेसमधील प्रवासी तरुणीने वॉशरूम मध्ये जाऊन कपडयाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

दुपारी एकच्या सुमारास भरधाव वेगामध्ये असणाऱ्या रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुणी स्वराज एक्स्प्रेसमधील वॉशरूम कोचमध्ये गेली होती. पण बराच वेळ उलटूनही ती परत आली असल्याने तिच्या आसपासच्या प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. अनेक वेळा दरवाजा वाजवून देखील आतून काहीच प्रतिक्रिया न आल्याने, अखेर  रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाजा उघडला असता,  २० वर्षीय तरुणी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

तिच्या गळ्याभोवती एक कपडा गुंडाळलेला होता. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वेत एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास डहाणू रोड आरएस येथे स्वराज एक्स्प्रेस रेल्वेला विशेष थांबा देण्यात आला आणि या ठिकाणी तरुणीचा मृतदेह उतरवण्यात आला,  अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली. संबंधित रेल्वे मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरा पर्यंत जात होती. परंतु मध्येच घडलेल्या या घटनेने तिला विशेष थांबा द्यावा लागला. या तरुणी कोण आहे आणि तिने अशी चालत्या रेल्वेमध्ये आत्महत्या का केली याबाबत तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular