22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeEntertainmentअनोख्या विषयाची नवीन वेबसीरिज पेट पुराण प्रेक्षकांच्या भेटीला

अनोख्या विषयाची नवीन वेबसीरिज पेट पुराण प्रेक्षकांच्या भेटीला

ही सोशल कॉमेडी सिरीज पाळीव प्राण्‍यांचे पालनपोषण करण्‍यावरील उत्‍साहवर्धक आहे.

सोनी लिव्हवर अभिनेत्री सई ताम्हणकरची नवीन वेबसीरिज पेट पुराण प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही सोशल कॉमेडी सिरीज पाळीव प्राण्‍यांचे पालनपोषण करण्‍यावरील उत्‍साहवर्धक आहे. ही सीरिज शहरी,  उदारमतवादी, विवाहित जोडपे अतुल व अदिती यांच्या आयुष्यावर आधारीत असून, त्या दोघांकडे दोन पाळीव प्राणी असून त्यात बाकू नावाची मांजर व व्‍यंकू नावाचा कुत्रा आहे. या पार्श्वभूमीवर सई ताम्हणकरशी गप्पा मारताना तिने पाळीव प्राण्यांसोबतचे रिहर्सल आणि शूटिंगमधील मजेदार किस्से सांगितले आहेत.

आजकाल अनेक जोडप्यांची आपल्याला इतक्यात तरी मुले होऊ नयेत ही इच्छा असते. पुढच पुढे बघू. आधी करिअर आणि मग मुलांचा विचार करू. परंतु कधीकधी त्यांना मुलाची गरज असल्याचे भासते. पण मग ते प्राणी पाळतात. अशाच परिस्थितीमधून अदिती आणि अतुल देखील जात आहेत. मग एके दिवशी ते ठरवतात कि, आपण एखादा प्राणा पाळायचा. पाळीव प्राणी आणल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की ही खूप मोठी जबाबदारी असून हे काम तर एखाद्या बाळाला जगात आणण्यापेक्षाही महा कठीण आहे. तिथून अदिती आणि अतुलाचा प्रवास सुरू होतो तेच हे पेट पुराण आहे.

अगदी नावाप्रमाणेच ही पाळीव प्राण्यांची गोष्ट आहे. अदिती ही सध्या युगातील मुलगी आहे. ती त्यांच्यापैकी एक आहे ज्यांना बाय-चॉइस मूल नको आहे. सेल्फ मेड आहे. ती आपल्या नवऱ्यासोबत राहते, पण तिने लग्नानंतर आपले आडनाव बदलले नाही. ती आजच्या मुलींसारखी स्वतंत्र आहे. या मालिकेतील स्टार हे पाळीव प्राणीच आहेत. यातील कुत्र्याचे नाव व्यंक असून त्याचे खरे नाव मात्र बडी आहे. एका सीनमध्ये बडीचे चार ते पाच टेक आहेत. अशावेळी तो सहाव्या टेकला बाहेर फिरायला जातो. एखाद्या वेळेस बडीचा एकादा क्लोझ टेक घेण्यासाठी तीन ते चार तास लागायचे. याविषयी निर्मात्यांना माहिती होते. पण तरीही त्यांनी हा हृदयस्पर्शी विषय मांडला.

RELATED ARTICLES

Most Popular