25.9 C
Ratnagiri
Monday, August 8, 2022

जिल्ह्यात पुढील ४८ तास रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे....

देशाच्या १४ व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण

देशाच्या चौदाव्या उपराष्ट्रपतीसाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजता...
HomeTechnologyकन्फर्म तिकीट मिळण्यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर काही टिप्स

कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर काही टिप्स

पाहूया कसे मिळवता येईल कन्फर्म तिकीट!

कोकण आणि उन्हाळ्याची सुट्टी हे समीकरणच काही और आहे. अनेक जण आपल्या गावी तर काही जण मित्रमैत्रिणी ग्रुपने सहलीला जातात. आणि प्रवासासाठी मात्र कोकण रेल्वे ठरलेली असते. परंतु अचानक प्लान ठरला तर मात्र तिकीट मिळताना पंचायत होते. लांबचा प्रवास असेल तर तिकीट कन्फर्म असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे सुट्ट्यांच्या हंगामात आयत्या वेळी एखादा प्लान केला तर तिकीट मिळणे खूप कठीण बनते.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक लोक गावी जातात. अशावेळी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होत असल्यामुळे कन्फर्म तिकीट मिळणे अवघड असते. तत्काळ कोट्यामधून सुद्धा तिकीट कन्फर्म होत नाही. परिणामी लोक एजंटकडे धाव घेतात. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून IRCTC च्या वेबसाईटवर काही टिप्स दिल्या आहेत, त्या फॉलो करून तुम्ही कन्फर्म तिकीट बुक करू शकता.

पाहूया कसे मिळवता येईल कन्फर्म तिकीट!

IRCTC अ‍ॅप डाउनलोड केल्यावर तुम्हाला मास्टर लिस्ट फिचरचा वापर करावा लागेल, या फिचरमध्ये प्रवासाची माहिती आधीच भरून ठेवा. ज्यामुळे तिकीट बुकिंगवेळी तुम्हाला पुन्हा माहिती भरावी लागणार नाही. मास्टर लिस्ट फिचरमध्ये तुम्ही माहिती सेव्ह करू शकता. एसी डब्यांसाठी तत्काळ बुकिंग १० वाजल्यापासून तर स्लीपर कोचसाठी ११ वाजल्यापासून बुकिंग सुरू होते. तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या आधी पाच मिनिटे आधी तुम्ही लॉगइन करा. यानंतर रूट सिलेक्ट करा. मास्टर लिस्टमध्ये सेव्ह केलेली माहिती अ‍ॅड करा. त्यानंतर पेमेंट ऑप्शनमध्ये UPI चा पर्याय निवडून या माध्यमातून पेमेंट करा, यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular