24.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriआरोग्य यंत्रणेचा ताण करणार कमी – नाम. सामंत

आरोग्य यंत्रणेचा ताण करणार कमी – नाम. सामंत

कोरोना काळामध्ये आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात आलेल्या ताणामुळे जास्तीत जास्त प्रमाणात वैद्यकीय सुविधा आणि केंद्रे निर्माण करण्याकडे शासनाचे लक्ष आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मिश्रा नाम. उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी गुहागर तालुक्यामधील रानवी भागामधील गेली अनेक वर्षे बंद असलेल्या निरामय रुग्णालयाची पाहणी केली. हे रुग्णालय बंद होउन साधारण २० वर्षे झाली असतील. इमारतीची पाहणी केली असता, इमारत सुस्थितीमध्ये असून, जर येथे कायमस्वरूपी निरामय रुग्णालय सुरु केले तर येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीशा प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाम. सामंतानी वर्तवली आहे.

चिपळूणचे उपविभागीय अधिकारी पवार यांनी उपस्थित मंत्र्यांना निरामयच्या मागील इतिहासाबद्दल माहिती सांगितली, सध्या त्यांची मालकी कोणाकडे आहे, याबाबत सुद्धा माहिती पुरविली. शासनाकडे पुन्हा ही जमीन येण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल याचवर चर्चा करण्यात आली. रुग्णालयाची पाहणी केली असता जर परत हे रुग्णालय कायमस्वरूपी सुरु करायचे असल्यास काय आणि कशी व्यवस्था केली पाहिजे याबाबत नाम. सामंत यांनी आरजीपीपीएल चे अधिकारी आणि संबंधित शासनाचे अधिकारी यांच्याशी आरजीपीपीएलच्या निवासी संकुलामध्ये बैठक घेऊन चर्चा केली.  

नाम. उदय सामंत यांनी झालेल्या बैठकीमध्ये पत्रकारांना माहिती दिली कि, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गेल्या २० वर्षापासून बंद असलेल्या निरामय रूग्णालयाची सद्य स्थिती काय आहे याबाबत विचारणा केली होती, त्याबाबतची सर्व माहिती त्यांनी मला आणि राऊताना सादर करायला सांगितली होती. या दौऱ्यातून केलेल्या पाहणीचे नक्कीच चांगल्या पद्धतीचे काही निर्णय घेण्यात येतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

RELATED ARTICLES

Most Popular