कोरोनाच्या या कालावधीमध्ये कोविड योद्ध म्हणून बरेच क्षेत्रातील माणसे कार्यरत होतीत. स्वत:च्या जीवाचा विचार न करता, एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वजण झटत आहेत. जसे पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सुविधेमध्ये दिवसरात्र कार्यरत असणारे कर्मचारी, एस.टी. कर्मचारी, शिक्षक यांची गणना फ्रंट लाईन वर्कर्स मध्ये करण्यात येते.
जरी शाळा प्रत्यक्षरीत्या बंद दिसत असल्या तरी शिक्षकांचे ऑनलाईन कामकाज सुरूच होते. त्यामध्ये प्राथमिक इयत्तांचा रिझल्ट अंतर्गत गुणांवरून तयार करणे, कोविड केंद्रामध्ये लागलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या ड्युटी त्यामुळे शाळा आणि शाळे व्यतिरिक्त शासनाची नेमून दिलेली कामे यामध्ये शिक्षकांचे दैनंदिन पद्धती पूर्णत: व्यग्र होत असे. शिक्षकाचा उत्स्फूर्त सहभाग विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये असतो.
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वतीने कोरोनाची ड्युटी असणार्या सर्व शिक्षकांसाठी एक सकारात्मक बातमी देण्यात येत आहे. कोरोनाबाधित प्राथमिक शिक्षक कुटुंबांसाठी दोन लाखाचे बिनव्याजी कर्ज देणार असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी दिली आहे.
मागील वर्षी जेंव्हा कोरोना सक्रीय झाला तेंव्हापासून ते कोरोनाच्या या आलेल्या दुसऱ्या लाटेमध्येही सामाजिक जाणिवेचे भान ठेवून रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक कोविड योद्धा म्हणून कार्यरत आहेत. त्यामध्ये अनेक शिक्षकाना कोरोनाची लागण सुद्धा झाली आहे. त्यामुळे अशा शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबातील संक्रमित सदस्यांच्या उपचाराकरिता रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या व्यवस्थापक मंडळाने २ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज पासून १ जून २०२१ पासून होणार असल्याची माहिती श्री. देवळेकर यांनी देऊन, गरजू सभासदांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.